S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

स्पेशल रिपोर्ट : 'युनिव्हर्सल हायस्कूल'ची मुजोरी, वाढीव फी न भरणाऱ्या 70 विद्यार्थ्यांना काढलं

Samruddha Bhambure | Updated On: May 31, 2017 12:04 PM IST

स्पेशल रिपोर्ट : 'युनिव्हर्सल हायस्कूल'ची मुजोरी, वाढीव फी न भरणाऱ्या 70 विद्यार्थ्यांना काढलं

उदय जाधव, मुंबई

31 मे : शैक्षणिक वर्ष सुरू होताच, पालक आणि शाळा प्रशासन असा संघर्ष सुरू होतो. दहिसरच्या युनिव्हर्सल हायस्कूलनं वाढीव फी ला विरोध केल्याबद्दल सत्तरापेक्षा जास्त जणांना काढून टाकलंय. त्यामुळे एकच खळबळ माजलीये. फी वाढ संघर्षात विद्यार्थी भरडले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या फीवाढीच्या विरोधात युनिव्हर्सल शाळेसमोर आज युवा सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. शाळेने नियमबाह्यरित्या शाळेल फीमध्ये 15 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे पालकांचं बजेट पुरतं कोलमडलं आहे. आता शाळांच्या मनमानी कारभाराला खरंच चाप बसणार का असा प्रश्न आता विचारला जातोय.दहिसरच्या युनिवर्सल स्कूलच्या मुलांना तावडे काका आपल्या शाळेचा प्रश्न खरंच सोडवणार का असा प्रश्न पडलाय.  या शाळेनं फी वाढीच्या मुद्द्यावर जवळपास 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना काढून टाकलंय. आता 5 जूनला त्यांची शाळा सुरू होणार आहे. पण आपल्या मुलांना शाळेत जाणार का? हा प्रश्नं या 70 मुलांच्या पालकांना पडलां आहे.

तेजस्विनी पुरंदरे याची दोन मुलं याच शाळेत शिकतात. पण वार्षिक दोन लाखांहून अधीक शाळा फी भरावी लागत असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाचं बजेट कोलमडून गेलंय.

युनिवर्सल शाळेने कायद्याचं उल्लंघन करत फी वाढ केलीय. त्याविरोधात आता सर्व पालक एकत्र येऊन संघर्ष करतायेत. याविषयी पालकांशी संवाद साधण्याची शाळेची तयारी नाहीये. आम्हीही संपर्क साधला असता शाळेनं आमच्याशी बोलणं टाळलंय.

शाळांची मुजोरी काही नवीन नाही. पण फी भरली नाही म्हणून ७० विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची हिम्मत येते कुठून? शाळेंच्या अरेरावीची किंमत मात्र विद्यार्थ्यांना मोजावी लागतेय. ही मुलं आणि पालकं न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचे तावडे काका हे खरंच त्यांना मदत करणार की त्यांना मामा बनवणार हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2017 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close