अमिताभ बच्चन यांच्या जीएसटीच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप

अमिताभ बच्चन यांच्या जीएसटीच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप

सरकारच्या अनेक जाहिरांतीमधून अमिताभ बच्चन दिसतात. पण अमिताभ बच्चन यांची जीएसटीची जाहिरात वादात सापडलीये.

  • Share this:

21 जून : सरकारच्या अनेक जाहिरांतीमधून अमिताभ बच्चन दिसतात. पण अमिताभ बच्चन यांची जीएसटीची जाहिरात वादात सापडलीये.

बिग बी अमिताभ बच्चन जशा इतर सरकारी पोलिओ, स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती करतात तशीच त्यांनी जीएसटीचीही जाहिरात करायला सुरुवात केलीये. त्यांच्या इतर जाहिरातींना आक्षेप घेतला गेला नाही पण त्यांच्या जीएसटीच्या जाहिरातीला आक्षेप घेतला गेलाय.

जीएसटी एक जुलैपासून लागू केला जाणार आहे. जीएसटीच्या करप्रणालीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जीएसटीविरोधात लोकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जी लोकं अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांच्या अभिनयावर प्रेम करतात त्यांनी जीएसटीची जाहिरात करू नये असं निरुपमांना वाटतं.

अमिताभ बच्चन एकेकाळी काँग्रेसचे खासदार होते. गांधी घराण्याशी त्यांची मैत्री सर्वांना माहिती होती. त्यानंतर त्यांची सपाशी वाढलेली जवळीक आणि आता सत्तेत असलेल्या भाजपशी अप्रत्यक्ष सलगी वाढलीये. या जवळकीचा अमिताभच्या प्रतिमेवर अजून विपरित परिणाम झालेला नाही. पण भविष्यात तो होणार नाही याची खात्रीही देता येणार नाही.

First published: June 21, 2017, 10:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading