S M L

#Mumbai26/11:''ताज'च्या अपमानाचे व्रण आम्ही पुसले'

'दहशतवाद्यांनी ताज हाॅटेलमध्ये घुसल्यानंतर आधी मनुष्यहानी केली. त्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणेनं रोखून धरलं तेव्हा सहाव्या आणि सातव्या मजल्यावर ग्रेनेड टाकून जाळपोळ केली. सहावा आणि सातव्या मजल्याची प्रचंड हानी केली होती'

Updated On: Nov 26, 2018 09:10 PM IST

#Mumbai26/11:''ताज'च्या अपमानाचे व्रण आम्ही पुसले'

मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला. या मुंबईची शान असलेल्या ताज हाॅटेलमध्ये घुसून हल्ला केला आणि इथंच त्या दहशतवाद्यांचा खात्माही झाला.


ज्या ताज हाॅटेलने मुंबईची शान वाढवली त्या वास्तूची दहशतवाद्यांनी प्रचंड नासधूस केली होती. न्यूज१८ लोकमत डाॅट काॅमच्या या विशेष मालिकेत वास्तूविशारद चेतन रायकर यांनी ताज पुन्हा कसे उभं राहिलं याबद्दल सांगितलं.


"ताज हाॅटेल असल्यामुळे ते एक कर्मशियल काम होतं. ते लवकरात लवकर करणे हे गरजेचं होतं. पण जगाला हे दाखवून देणे होते ही अपमानाचे व्रण मिटवून टाकणे ही आमची भावना होती. आम्ही ते करून दाखवलं."

Loading...

#Mumbai26/11: ...तर ३ वर्षांत सुटका होऊन पाकिस्तानात गेला असता कसाब!


"ताज हाॅटेलकडून आम्हाला संपूर्ण मदत करण्यात आली. ज्या ठिकाणी जे नुकसान झालं त्या ठिकाणी तीच वस्तू लावण्यात आली. यासाठी मुळ साहित्यच तिथे पुन्हा वापरण्यात आलं. दहशतवाद्यांनी हाॅटेलमध्ये जे काही नुकसान केलं होतं त्यानंतर तसेच्या तसे ताज हाॅटेल उभारले."


"मी सैनिक नाही, डाॅक्टर नाही. एवढ्या प्रमाणात माणसाची हानी पाहिली नाही. आजपर्यंत आम्ही आग लागलेल्या इमारतीची दुरुस्ती केली. पण दहशतवाद्यांकडून एखाद्या वास्तूची नासधुस करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली अशा वास्तूचे काम कुणालाही मिळू नये."

#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'!


"दहशतवाद्यांनी ताज हाॅटेलमध्ये घुसल्यानंतर आधी मनुष्यहानी केली. त्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणेनं रोखून धरलं तेव्हा सहाव्या आणि सातव्या मजल्यावर ग्रेनेड टाकून जाळपोळ केली. सहावा आणि सातव्या मजल्याची प्रचंड हानी केली होती."

#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही


"तुम्ही तोडणार तर आम्ही जोडणार' या हीन कृत्याला माझ्या कामातून हेच उत्तर होते. आज दहा वर्षांनंतर जेव्हा ताज हाॅटेलपासून जातो तेव्हा ते मला एक स्माईल देत असं वाटतं."


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 09:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close