मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले 151 धनादेश बाऊन्स !

मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले 151 धनादेश बाऊन्स !

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले जवळपास 151 धनादेश बाऊन्स झाल्याचं आरटीआयमधून स्पष्ट झालंय.

  • Share this:

रोहिणी गोसावी,प्रतिनिधी

01 डिसेंबर : मुख्यमंत्री सहायता निधीला नागरीक सामाजिक कक्ष म्हणून मदत करतात. पण यातले सगळेच पैसे निधीमध्ये जमा होतातच असं नाहीये. कारण मदतीसाठी दिलेले अनेक धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती आरटीआयमधून उघड झालीये.

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले जवळपास 151 धनादेश बाऊन्स झाल्याचं आरटीआयमधून स्पष्ट झालंय. मुंख्यमंत्र्यांच्या सहायता निधीला नागरिक स्वेच्छेनं मदत करत असतात. पण अनेक वेळा खात्यात पैसे नसल्यानं, चेक आऊटडेट आल्यानं बाऊन्स झालेत, तर काही धनादेश हे स्टॉप पेमेंट केल्यानं ते वटवता आलेले नाहीत. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगेंनी यासंदर्भात आरटीआयमधून माहिती मिळवलीये.

कांतीबेन रसिकलाल शहा ट्रस्टनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्री कार्यालयानं त्यांच्या सोशल मीडियावरुन फोटोही प्रसिद्ध केला होता. पण नंतर त्यांचा चेक स्टॉप पेमेंट करुन थांबवण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयानं बाजू सावरुन घेत ट्रस्टचे पैसे जमा झाल्याचं सांगण्यात आलं.

मुख्यमंत्री सहायता निधीची एकूण चार खाती आहेत

मुख्यमंत्री सहायता निधी

मुख्यमंत्री जलयुक्त शिवार सहायता निधी

मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधी

मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी (हे खाते 30 जून 17 पासून सुरू)

बाऊन्स झालेल्या धनादेशांमध्ये वैयक्तिक धनादेशांबरोबरच ट्रस्ट आणि वेगवेगळ्या संस्थांचे 400 रुपयांपासून लाखो रुपयांच्या धनादेश आहेत. यातले दोन धनादेश पोलीस आयुक्त कार्यालयाचे आणि काही सरकारी कार्यालयांचेही धनादेश आहेत.

First published: December 1, 2017, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading