S M L

जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना 'मोदी केअर' चा शुभारंभ 2 आॅक्टोबरला !

'मोदी केअर' योजना जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा जेटलींनी केला होता. ही आरोग्य योजना कैशलेस स्वरुपात असणार आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2018 11:28 PM IST

जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना 'मोदी केअर' चा शुभारंभ 2 आॅक्टोबरला !

02 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 'मोदी केअर' योजनेची घोषणा केली होती. मात्र, 2 आॅक्टोबरला अर्थात गांधी जयंतीच्या दिवशी या योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे.

'मोदी केअर' योजना जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा जेटलींनी केला होता. ही आरोग्य योजना कैशलेस स्वरुपात असणार आहे.

मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जनतेला बराच काळ वाट पहावी लागणार आहे. कारण आठ महिन्यांनंतर ही योजना लागू होणार असून त्यासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय स्वास्थ संरक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या या 'मोदी केअर' योजनेसाठी गरज पडल्यास निधीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे. या योजनेचा देशभरातील ४० टक्के लोकसंख्येला फायदा होणार आहे. म्हणजेच १० कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास ५ लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी वीमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 11:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close