Home /News /special-story /

मनसेसैनिक पुसताय इंग्रजी पाट्या, पण नेत्याच्याच हाॅटेलची पाटी इंग्रजीत !

मनसेसैनिक पुसताय इंग्रजी पाट्या, पण नेत्याच्याच हाॅटेलची पाटी इंग्रजीत !

कल्याणमध्ये मनसेनं इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन केलं. पण ज्या नेत्यांनी हे आंदोलन केलं त्यांच्याच हॉटेलवरच्य़ा पाट्या मराठीत नसल्याचं समोर आलंय.

  किरण सोनावणे, कल्याण 16 मे : कल्याणमध्ये मनसेनं इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन केलं. पण ज्या नेत्यांनी हे आंदोलन केलं त्यांच्याच हॉटेलवरच्य़ा पाट्या मराठीत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे मनसेचे हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची चर्चा कल्याणात सुरू आहे. कल्याणमधील मनसे कार्यकर्ते सध्या काय करतायेत असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच मनसे कार्यकर्ते सध्या दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासण्याचं काम करतायेत. मराठी पाट्यांसाठीचं हे आंदोलन अगदी बरोबर आहे. पण दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे त्या मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाईंचं खडकपाड्यात सृष्टी हॉटेल आहे. त्या हॉटेलची पाटी मात्र इंग्रजीत आहे. शहराध्यक्ष झाले, जिल्हाध्यक्षांचंही काही वेगळं नाही. जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या साईमहादेव हॉटेलची पाटीही ठळक इंग्रजी अक्षरात आहे. देसाईंना त्यांच्या हॉटेलच्या पाटीबाबत विचारलं तेव्हा त्यांची मात्र बोबडीच वळली. राज ठाकरेंनी आदेश दिल्यावर आंदोलन हे झालंच पाहिजे, आणि आंदोलनही बरोबर आहे. मात्र समाजात कोणतीही सुधारणा करताना सुरुवात मात्र स्वतःपासून केली पाहिजे हे मात्र मनसेसैनिक विसरलेले दिसतायेत. त्यामुळे कल्याणमधील मराठी पाट्यांच्या या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणायचं नाही काय असा सवाल उपस्थित केला जातोय.
First published:

Tags: Kalyan, MNS, कल्याण, मनसे

पुढील बातम्या