S M L

बुरख्याआड राहणारी नुसरत परवीन झाली आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया !

. आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया होवून आणि सर्व महिलाना दाखवून दिलंय की फक्त सौंदर्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता आणि आंतरिक सौंदर्याला किती महत्व आहे.

Updated On: Aug 4, 2018 08:26 PM IST

बुरख्याआड राहणारी नुसरत परवीन झाली आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया !

प्रदीप वाडेकर,लोणावळा, 4 आॅगस्ट : एखाद्या साध्या छोट्याश्या शहरात राहणाऱ्या गृहिणीने जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जावून मिसेस इंडिया हा किताब मिळवला तर हे आश्चर्य वाटण्याजोग आहे...हो अशीच  किमया घडवलीय लोणावळ्यातील नुसरत परवीन हिने...बुरख्या आड राहणे ही परंपरा असताना, त्यात पाठीशी कोणाचीही साथ नसताना जिद्द करीत, अनेक पायऱ्या पार करत अखेर तिने आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया हा खिताब पटकावलाच.

तीच वेगळे पण म्हणजे साधेपणा ज्याला 'सादगी' म्हणतात आणि याच साद्गीवर तिने भारतातील ९ हजार महिलातून प्रथम क्रमांक पटकावला आणि मिसेस इंडिया झाली सर्व गृहीनिना आदर्श ठरावी अशी कामगिरी केली.

सहज मुलांच्या सांगण्यावरून फॉम भरला, या स्पर्धेचा गंध ही नसताना शेवटच्या दहामध्ये नुसरतची निवड झाली.अंतिम स्पर्धा मलेशियात होती जाण्याचा खर्च कोण करणार थोडी फार मदत मिळाली आणि होते नव्हते तेवढे पैसे जमा केले आणि मलेशियाला नुसरत पोहचली. या ऐवढ्या मोठ्या स्पर्धेत हिचा निभाव कसा लागेल असं प्रत्येकाला वाटत होतं  पण याच मध्यमवर्गीय गृहिणीला तिच्या साधेपणाला महत्व देवून परीक्षकांनी तिला प्रथम क्रमांक दिला याचा तिला  आनंददायी धक्का मिळाला.


गृहिणीनी नुसते चौकटीत न राहता आत्मविश्वासाने अशा स्पर्धेत किंवा व्यवसायात पुढाकार घेवून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे असे नुसरत न्यूज १८ लोकमतशी बोलताना म्हणाल्या.

इंडिया फॅशन फेस्टिवल आयोजित मिसेस इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेत दिल्ली, औरंगाबाद, बंगलोर मुंबई अशा विविध शहरातून नऊ हजार सहाशे सत्तर महिला आॅनलाईन  सहभागी झाल्या होत्या. यात अंतिम फेरीत महाराष्ट्रातून दोघींची निवड झाली. यात एक मुंबईची तर नुसरत परवीन या मुळच्या काश्मिरी असलेल्या एकमेव लोणावळ्याच्या महिला पहिल्यांदाच मिसेस इंडिया झाल्या.

Loading...
Loading...

खरंच या महिलेनं कुणाचा आधार न घेता आपले अस्तित्व सिद्ध केलंय. आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया होवून  आणि सर्व महिलाना दाखवून दिलंय की फक्त सौंदर्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता आणि आंतरिक सौंदर्याला किती महत्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 08:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close