मिल ते कॉर्पोरेट हब..,कमला मिलचा 30 वर्षांचा प्रवास!

मिल ते कॉर्पोरेट हब..,कमला मिलचा 30 वर्षांचा प्रवास!

कमला मिल कंपाऊंडमध्ये जवळपास 37 हॉटेल्स, सहा मीडिया हाऊसेस, आणि आठ बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस उभं राहिलं.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई

29 डिसेंबर : मुंबईतली एक गिरणी ते कॉर्पोरेट कंपन्यांचं हब अशी कमला मिल कंपाऊंडची ओळख...गेल्या तीस वर्षांत झालेल्या बदलाचा घेतलेला हा आढावा...

पूर्वेतलं मँचेस्टर अशी मुंबईची ओळख झाली ती मुंबईतल्या गिरण्यांमुळे... गिरणगावातल्या सर्वात मोठ्या मिलपैकी कमला मिल...गिरणी कामगारांच्या संपानंतरच्या काळात ज्या गिरण्या बंद झाल्या त्या गिरण्यांमध्ये कमला मिलही होती. गिरणी कामगार देशोधडीला लागले. कमला मिलची धडधड बंद पडली. पण याच गिरणीचे गेट हळूहळू उघडू लागले.

कमला मिलच्या आवारातील इमारतींमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेसनी संसार थाटला. 2000 नंतर गिरणीच्या इमारतींवर मल्टीनॅशनल कंपन्यांचे बोर्ड दिसू लागले. बँका, सेवा क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांची हेड ऑफिसेस या ठिकाणी दिसायला लागली. इथं काम करणारा सूटबुटातला नवतरूण वर्ग दिसू लागला.

कमला मिल कंपाऊंडमध्ये जवळपास 37 हॉटेल्स, सहा मीडिया हाऊसेस, आणि आठ बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस उभं राहिलं.  दिवसा हजारो कामगार या कमला मिलच्या कंपाऊंडमध्ये काम करतात. तर रात्र झाली की या गिरणीत उच्चभ्रू वर्गातल्या तरुण तरुणींची गर्दी होते. पाच आकडी पगार मिळवणाऱ्या या उच्च मध्यमवर्गीयांसाठी कमला मिलमध्येच पब सुरू झाले.

मुंबईतल्या या जमिनीला सोन्याचा भाव आल्याने या भागात दाटीवाटीनं बांधकामं उभी राहिली. ही बांधकामं उभारताना नियमही धाब्यावर बसवण्यात आले. त्यातूनच कमला मिलमधील अग्नितांडवाची पार्श्वभूमी तयार झाली.

मिल ते कॉर्पोरेट हब

37 हॉटेल्स

06 मीडिया हाऊसेस

08 बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 10:50 PM IST

ताज्या बातम्या