लयभारी : लग्नात वऱ्हाड्यांना पेरुच्या रोपांची पानसुपारी,पंतप्रधानांकडूनही कौतुक

लयभारी : लग्नात वऱ्हाड्यांना पेरुच्या रोपांची पानसुपारी,पंतप्रधानांकडूनही कौतुक

जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन पाहुणे मंडळींचा सत्कार केला तो चक्क कलमी पेरुची रोपं वाटून...

  • Share this:

रायचंद शिंदे,चुन्नर

17 मे : लग्न सोहळा म्हटला की, पाहुण्यांच्या सत्कारासाठी हार तुरे,श्रीफळ, फेटे, टॉवेल-टोपी हे सर्व आलेच..पण जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन पाहुणे मंडळींचा सत्कार केला तो चक्क कलमी पेरुची रोपं वाटून... यामुळे लग्न मंडपात सगळीकडे प्रत्येक पाहुण्यांच्या हातात पेरूची रोपं पाहायला मिळाली.

हे कुठल्या नर्सरीचं दृष्य नाही...ना वन विभाच्या वृक्ष रोपणाचा कार्यक्रम...तर हा आहे लग्नमंडप...आणि वऱ्हाडाच्या हातात आहेत ती पेरुची रोपं...आणि हे वऱ्हाड आलंय नारायणगावच्या मेहेत्र कुटुंबाच्यामुलाच्या लग्नासाठी.  या लग्नसोहळ्यात मेहेत्रे कुटुंबाने पाहुणे मंडळीचं स्वागत केलं ते पेरुची रोप देऊन..या सोहळ्याच्या निमीत्तानं 4 हजार पेरुची रोपं वाटण्यात आली.

या लग्नात अक्षदाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. एका हातात रोप आणि दुसऱ्या हातात फुलं असं सुंदर दृष्य बघायला मिळालं.. गेल्या वर्षी त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी त्यांनी केशरी आंब्याचं रोपं वाटलं होतं. आणि त्या विवाह सोहळ्याची दखल पंतप्रधानांनी  मन की बातमध्ये घेतली होती.

परंपरेत न अडकता...त्या परंपरेला असं सुंदर रुपही देता येत हे मेहेत्र कुटुंबानं दाखवून दिलं...टॉवेल-टोप्याच्या जागी...रोपं देण्याची ही आयडीया लयभारी...

First published: May 17, 2017, 9:37 PM IST

ताज्या बातम्या