वानराला मारणाऱ्यांनो, हे पाहाच !, 'त्यांनी' दिले हत्तीच्या पिल्लाला जीवदान !

वानराला मारणाऱ्यांनो, हे पाहाच !, 'त्यांनी' दिले हत्तीच्या पिल्लाला जीवदान !

माणुसकी जिवंत आहे हे यांचं उदाहरण असून मुक्या वानराला जीवे मारणाऱ्यांच्या सणसणीत चपराक आहे

  • Share this:

19 डिसेंबर : दोनच दिवसांपूर्वी वाशिममध्ये एका व्यक्तीने वानराला अमानुष मारहाण करून जीव घेतला. अशा घटना पाहून माणुसकी मेली का असा प्रश्न निर्माण होतो. पण, माणुसकीची मूर्तीमुंद उदाहरण तामिळनाडूमध्ये पाहण्यास मिळालं. एका हत्तिणींचं पिल्लू नाल्यात पडलं, त्याला बाहेर काढून तिच्याकडे सोडण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी खांद्यावर घेऊन आई-पिल्लाची भेट घडवून आणण्याची घटना समोर आलीये.

ही घटना एका आठवड्यापूर्वींची आहे. तामिळनाडूच्या कोयंटूर क्षेत्रात येणाऱ्या मेट्टूपलाम जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हत्तींचा कळप रस्ता रोखून होता. तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना हे हत्ती का थांबले असा प्रश्न पडला. अखेर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनअधिकाऱ्यांनी फटाके फोडून हत्तीच्या कळपाला पिटाळून लावलं. पण एक हत्तीण तिथे परत आली. तिलाही तिथून पळवून लावलं, पण ती पुन्हा तिथे आली. वनअधिकारीही तिच्या अशा वागण्याने चक्रावून गेले.

तिथूनच थोड्या अंतरावर एका नाल्यात कुणी तरी अडकल्याचा आवाज स्थानिकांना आला. त्यांनी वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तिथे गेल्यावर एका बंद नाल्यात हत्तीचे पिल्लू अडकल्याचं आढळून आलं. हा नाला इतका किचकट होता की पिल्लू नाल्यात असेल याची कुणालाही शंका येणार नाही. वन अधिकाऱ्यांना लगेच याचा अंदाजा आला की, हे पिल्लू त्या हत्तीणींचं आहे. वन अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पिल्लाला नाल्यातून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर या हत्तीच्या पिल्लाची प्रकृती खूप खालावलेली होती.

वन अधिकाऱ्यांनी पिल्लाला घेऊन त्याच्या आईकडे आणलं. रस्त्यावर त्याला चालताही येणे कठीण झाले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी स्वता:च्या खांद्यावर घेऊन त्याच्या आईकडे आणून सोडलं. जेव्हा या पिल्लाला त्याच्या आईकडे सोडलं तेव्हा हा प्रसंग पाहण्यासारखा होता. आई आणि पिल्लाची ही अनोखी भेट पाहून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

वन अधिकाऱ्यांकडे एक नजर टाकून आई आणि पिल्लाने तिथून निरोप घेतला. पण दोन दिवसांनंतर ती पुन्हा त्याच ठिकाणी आली. स्थानिकांनी पुन्हा वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

वन अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, पिल्लाची प्रकृती अजूनही सुधारलेली नाही. त्यांनी हत्तीणींच्या पिल्लाला ग्लुकोज , लॅक्टोजेन आणि नारळ पाणी दिले.  अखेर दोन दिवसांचा पाहुणचार आटोपून हत्ती आणि पिल्लाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन जंगलाकडे प्रस्थान केलं. माणुसकी जिवंत आहे हे यांचं उदाहरण असून मुक्या वानराला जीवे मारणाऱ्यांच्या सणसणीत चपराक आहे एवढं मात्र नक्की....

======================================================

संबंधीत बातम्या

माणूस की जनावर ?, मुक्या जिवाला झाडाला बांधून जीवे मारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 11:06 PM IST

ताज्या बातम्या