डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या स्नेहलने शिकायचं कसं?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 12:04 AM IST

डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या स्नेहलने शिकायचं कसं?

मंगेश चिवटे, मुंबई

11 मे : या फी वाढीच्या चक्रात अडकलेल्या एका जिद्दी मुलीची आणि तीच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या आई-वडिलाची ही स्थितीही बघा...

या जिद्दी मुलीच नाव आहे स्नेहल जाधव...स्नेहलच इलेझराचं ऑपरेशन झालाय. 3 इंच हाड तीच्या पायातून कापण्यात आलंय. आणि एक-दोन वेळा नव्हे 7 वेळा तीचं ऑपरेशन झालंय.

इतक्या अडचणीनंतरही तीच्यातली डॉक्टर बनण्याची जिद्द कायम आहे. तीच्या जिद्दीचा मेहनतीचा तीच्या वडिलांना अभिमान आहे.

स्नेहल बी.के.एल.वालावलकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. मोठ्या जिद्दीनं अभ्यास करतेय. पण अचानक झालेल्या फी वाढीमुळे सध्या स्नेहलच अभ्यासावरच लक्ष विचलीत झालंय.

Loading...

स्नेहलच्या स्वप्नासाठी झटणारे तीचे आई वडील तर पार खचलेत मुलीला डॉक्टर करायचंय पण पैसे आणायचं कुठून ?

स्नेहलची जिद्द आणि तीला डॉक्टर करण्याची आई-वडिलांची धडपड...अडसर आहे तो वाढत्या फीचा आणि आधार आहे तो फक्त सरकारचा...बघाचंय सरकार या पालकांची दखल घेणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 12:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...