भारतीय आठवड्यातील 4 तास टीव्हीसमोर तर 28 तास मोबाईलवर !

भारतीय आठवड्यातील 4 तास टीव्हीसमोर तर 28 तास मोबाईलवर !

या रिपोर्टनुसार भारतीय एका आठवड्यात फक्त चारच तास टीव्ही बघतात. मात्र हेच भारतीय एका आठवड्यात २८ तास मोबाईलचा वापर चॅटिंग,कॉलिंग आणि सर्फिंगसाठी करतात

  • Share this:

03 जून : मोबाईलच्या आहारी किती जाणं यालाही काही मर्यादा असते हे म्हणण्याचं कारण म्हणजे, २०१४-२०१६ या दोन वर्षांत 150 अब्ज तास मोबाईलवर इंटरनेटचा वापर झालाय. एवढंच नाहीतर लोकं टीव्ही कमी पण मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले असतात असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय.

मेरी मीकर यांनी वाढत्या इंटरनेट वापरावर 'इंडिया इंटरनेट ट्रेन्डस 2017' हा रिपोर्ट नुकताच सादर केलाय. यात भारतात वाढलेल्या इंटरनेट वापरावर भाष्य केलंय.

या रिपोर्टनुसार भारतीय एका आठवड्यात फक्त चारच तास टीव्ही बघतात. मात्र हेच भारतीय एका आठवड्यात २८ तास मोबाईलचा वापर चॅटिंग,कॉलिंग आणि सर्फिंगसाठी करतात.

भारतात जवळपास 35.5 कोटी इंटरनेट युजर्स असल्याचा दावा हा रिपोर्ट करतो. या युजर्सची संख्या 28 टक्क्यांनी दर वर्षी वाढते आहे.

हे युजर्स डेटा वापरातील 45 टक्के वेळ मनोरंजनासाठी तर 34 टक्के वेळ सोशल मीडिया,सर्चिंग आणि इतर गोष्टींसाठी वापरतात.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे भारतातील अॅण्ड्रॉइड युजर्सनी २०१४-२०१६ या दोन वर्षात 150 अब्ज तास इंटरनेटचा वापर केला.

एवढंच नाही तर ब्रॉडबॅण्डच्या वापर ही लक्षणीय वाढलाय.भारतातील 22.७ कोटी लोक आज ब्रॉडबॅण्ड युजर्स झालेत.असे अनेक धक्कादायक दावे हा रिपोर्ट करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 10:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading