जुन्नरमध्ये इंग्रजी शाळांचाच टक्का घसरला, मराठीचा वाढला

इथे इंग्रजी शाळांचाच टक्का घसरून पुन्हा एकदा मराठीचा टक्का वाढतोय. हा टक्का थोडाथोडका नसून तो राज्यात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 11:46 PM IST

जुन्नरमध्ये इंग्रजी शाळांचाच टक्का घसरला, मराठीचा वाढला

रायचंद शिंदे, जुन्नर

18 मे : मागील काही वर्षांत शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचा बोलबाला वाढला होता. त्यामुळे मराठी शाळांचा टक्काही घसरला होता. मात्र, जुन्नर तालुक्यात यावेगळी परिस्थिती आहे. इथे इंग्रजी शाळांचाच टक्का घसरून पुन्हा एकदा मराठीचा टक्का वाढतोय. हा टक्का थोडाथोडका नसून तो राज्यात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत पुणे येथील विद्या प्राधीकरणाच्या सर्व्हेत माहिती उघड झाली असून नुकताच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही याला दुजोरा दिलाय.

जुन्नर...पुणे जिल्ह्यातील बागायती पट्टा असलेला सधन तालुका... गेल्या काही वर्षांत इथेही इंग्रजी शाळांचं मोठं पेव फुटलं. सावरगाव शेतकरी कुटुंबातील नवनाथ हिंगे यांनीही मग आपल्या मोठ्या मुलाला प्रथमेशला नर्सरीत इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला. पण  शाळेतून घरी आलेला प्रथमेश नेमका काय शिकतोय हे त्याच्या आईवडिलांना कळेना...परिणामी त्याची टक्केवारी घटली..

सृष्टीलाही तिच्या आईवडिलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं खरं...पण ती इंग्रजीसोबत मराठीतही मागे पडायला लागली. सुरुवातीला आकर्षण असलेली ही इंग्रजी शाळा आता मात्र सगळ्यांनाच अवघड वाटायला लागली होती.

इंग्रजी शाळेचा असा अनुभव असताना इथल्या मराठी शाळांनी मात्र कात टाकायला सुरुवात केली होती. लोकसहभागातून या शाळांचा चेहरामोहराही बदलला.  डिजिटल वर्ग आणि डिजिटल शाळा, प्रतिष्ठेचे ISO मानांकन, १०० टक्के सर्वच शाळांत ज्ञानरचनावाद,  तंत्रस्नेही शिक्षक, या सर्व गोष्टींमुळे जुन्नर तालुका गुणवत्ता विश्लेषणात राज्यात पहिल्या २० तालुक्यात आला आहे. तर राज्यातील टॉप ५० केंद्रांत  जुन्नरची ५ केंद्रे आहेत. मराठी शाळांच्या या बदलत्या रुपड्यामुळे मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांचाही टक्का वाढला.

Loading...

यामागे मोठा वाटा आहे तो  जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांचा.

शहरी भागात मराठी शाळांचं अस्तित्व नामशेष होत असताना जुन्नरच्या या ग्रामीण भागात मात्र मराठी शाळांकडे वाढलेली ओढ ही नक्कीच दिलासादायक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 11:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...