S M L

याचा शेवट काय?

परवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय?

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 01:45 PM IST

याचा शेवट काय?

25 जून : महाराष्ट्राच्या दोन वीर जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय?

संदीप जाधव हे मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येणार होते, वर्षभराच्या बाळाचा वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचा विचार वडील म्हणून संदीप जाधव यांनी केलेला. तयारी कुठपर्यंत आलीय ह्याची माहितीही ते अधूनमधून घरी फोन करून घ्यायचे. पण काळाच्या पोटात वेगळंच काही असावं. पाकिस्तानच्या हल्ल्यात परवा दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे असल्याचं उशिरा कळलं. त्यात संदीप जाधव हे एक होते. मुलाच्या वाढदिवसाला ते घरी आले पण शवपेटीतून. देशासाठी संदीप जाधवांना वीरमरण आलं. त्यांचं मुळगाव असलेल्या केळगावात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

संदीप जाधव शहीद झाल्याचं त्यांच्या घरी उशिरा कळवलं गेलं. त्यातही फक्त त्यांच्या वडिलांना. तोपर्यंत टीव्हीवरून दोन्ही जवानांची माहिती दिली जात होती. सुनेपासून मृत्यूची बातमी लपवावी म्हणून संदीप जाधवांच्या वडिलांनी मोठी खटाटोप केली पण घरातल्या टीव्हीनं ते सांगितलंच. मग ती सगळी रात्र गावकऱ्यांची वाट बघण्यात गेली.कोल्हापूरच्या सावन मानेंचं तर लग्नही झालेलं नव्हतं. चार वर्षापूर्वी ते लष्करात रुजू झाले. त्यांच्या लग्नाची घरचे तयारीही करत होते. बोलणी सुरू होती असं समजतं. पण शेवटी देशासाठी त्यांनाही वीरमरण आलं. त्यांचं मूळगाव असलेल्या गोगवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशी जमलेली होती. काही काळ पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या.

ढगं भरून आलीयत. शिवार हिरवा झालाय. पावसानं काही ठिकाणी दडी मारलीय. गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रानं डझनभरापेक्षाही जास्त जणांनी हिमालयाचं रक्षण करताना जीव गमावलाय. सीमेवरचा तणाव इतका जास्त आहे की कुणाच्या मृत्यूची बातमी कधी येऊन धडकेल सांगता येत नाही.संदीप जाधव आणि सावन माने यांना निरोप देताना महाराष्ट्राचा मात्र बांध फुटला. डोळ्यात अश्रू दाटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 01:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close