कारागृह की छळछावण्या?

महाराष्ट्रातील भायखळा, आर्थर रोड, ठाणे आणि कोल्हापूर जेलमध्ये २००४ पासून १२६ कैद्यांचा मृत्यू झालाय. त्यापैकी अनेकांचे मृत्यू संशयास्पद आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2017 11:18 AM IST

कारागृह की छळछावण्या?

उदय जाधव, 29 जून : मुंबईत भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा तुरुंगातील छळछावणीचं वास्तव समोर आलंय. महाराष्ट्रातील भायखळा, आर्थर रोड, ठाणे आणि कोल्हापूर जेलमध्ये २००४ पासून १२६ कैद्यांचा मृत्यू झालाय. त्यापैकी अनेकांचे मृत्यू संशयास्पद आहेत. जेलमधील पोलिसांच्या छळ छावणीमुळेच कैद्यांच्या मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे.

भायखळा जेलमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीची बळी ठरलेली मंजुळा शेट्ये. तिच्या मृत्यूने जेलमधील छळछावणीचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. याच भायखळा जेलमध्ये गेल्या तीन वर्षात ४ महिला कैद्यांचा मृत्यू झालाय.

2015 ते 2017 तीन वर्षातील मृत्यू

सलताबीबी नजरुल शेख

मोण्डे नावा

Loading...

भावना हर्षद गिरी

बबिता मायला तमंग

या त्या महिला आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आलीय.

भायखळा जेलप्रमाणेच महाराष्ट्रातील इतरही प्रमुख जेलचं भयाण वास्तव माहितीच्या अधिकारात उघड झालंय. २००४ ते २००७ मध्ये एकट्या आर्थर रोड जेलमध्ये  ५५ कैद्यांचा मृत्य झाला आहे.

२०१५ ते २०१७ मध्ये कारागृहात झालेले मृत्यू

भायखळा ४ महिला कैद्यांचा मृत्यू

आर्थर रोड जेलमध्ये २४ कैद्यांचा मृत्यू

ठाणे सेंट्रल जेलमध्ये २१ कैद्यांचा मृत्यू

कोल्हापूर सेंट्रल जेलमध्ये ४३ कैद्यांचा मृत्यू

येरवडा, नाशिक सेंट्रल जेल प्रशासनानं कैद्यांचा मृत्यूची माहिती देण्यास नकार

जेलमध्ये गैरकारभार आणि भ्रष्ट्राचार उघडपणे सुरू आहेत. पण पोलिसांच्याच हितसंबंधामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे जेलमधील कैद्यांचा छळछावणीत मृत्यू झाला तरी आजवर पोलिसांवर कोणतीच कारवाई झालेली नाहीये. कैद्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई झाली तरच महाराष्ट्रातील कारागृहं हे सुधारगृहं बनतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...