S M L

माणुसकीची गोष्ट : वेड्यांचं 'वेड' लागलेला माणूस!

रस्त्यावर आयुष्य काढत फिरणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या घरी आणायचं आणि त्यांना माणसात आणून त्यांच्या घरी पाठवायचं यासाठी अमित यानी आपलं जीवन समर्पित केलंय.

Updated On: Aug 28, 2018 10:55 PM IST

माणुसकीची गोष्ट : वेड्यांचं 'वेड' लागलेला माणूस!

दिनेश केळुसकर, कोल्हापूर, 28 आॅगस्ट : वेड्यांचं वेड लागलेला एक माणूस आजरा गावात राहतो. त्याचं नाव आहे अमित प्रभा वसंत. रस्त्यावर आयुष्य काढत फिरणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या घरी आणायचं आणि त्यांना माणसात आणून त्यांच्या घरी पाठवायचं यासाठी अमित यानी आपलं जीवन समर्पित केलंय. कुठल्या ना कुठल्या कारणानं बिघडलेल्या मानसिक अवस्थेत आपलं गाव, आपलं घर, आपली सर्व नाती सोडून भणंग अवस्थेत रस्त्यावरचं जगणं वाट्याला आलेल्या आणि कचऱ्यात पडलेल्या या मनोरुग्णांसाठी अमित प्रभा वसंत हा माणूस देवदूत ठरलाय. स्वता:चं घर, शेती आणि शिक्षकाची चांगली नोकरी सोडून मनोरुग्णांना त्यांचं घर आणि त्यांची माणसं परत मिळवून देणं हेच आता त्यांचं जीवन झालंय.

न्यूज18 लोकमतशी बोलताना अमित म्हणाले की, मी लहानपणी घरात येणाऱ्या म्हाताऱ्या माणसानाही हाताला धरून खायला घातलेलं आहे. कॉलेजला असताना हे मनोयात्री दिसायचे, पण पुढे जाउन त्यांना खायला द्यावं याचं धाडस होत नव्हतं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की यांना खायला देत असताना बाकीचे लोक मला बघतील म्हणून मला भीती वाटते. पण, ते लोकंही देत नाहीत ना त्यांना खायला. म्हणून मग आपणच पुढं व्हाव आणि द्यावं असं ठरवलं. आणि त्याच दिवसापासून मी त्यांना बिनधास्तपणे खायला द्यायला लागलो.

यासाठी अमित यांना त्यांचे मित्र सोमनाथ चौगुले यांनी त्यांची एक खोली निःशुल्क वापरायला दिली. आजतागायत त्यांनी अशा दीडशेच्यावर मनोरुग्णांना आपल्या घरी आणलंय. तर 70 हून अधिक जणांना त्यांचं घर मिळवून दिलंय. हे सर्व मनोरुग्ण भारताच्या वेगवेगळ्या राज्यातले आणि नेपाळमधले सुध्दा आहेत. या कामात त्याना मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानींचंही सहकार्य मिळतंय.

अमित म्हणतात, वेगवेगळ्या कारणांमुळे या लोकांनी घर सोडतात. घरातला संघर्ष, नोकरीतला संघर्ष किंवा प्रेमभंगामुळेही हे मनोयात्री बाहेर पडलेले असतात. त्याना मी जेव्हा घरी घेउन येतो, तेव्हा माझ्या डोक्यात एकच विषय असतो तो म्हणजे त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था. प्रथम त्यांची स्वच्छता केली जाते. काही दिवसांसाठी त्याना इथे ठेवतो. असे मनोयात्री प्रेमाने ठीक होतात. बरेचसे तसे सोडले असल्याचे अमित सांगतात. बरेचदा आर्युर्वेदीक औषधे दिल्यानंतर ते बरे होतात. मात्र, ज्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की हे माझ्या आवाक्याच्या पलिकडच आहे, तेव्हा मी डॉ. भरत वाटवानी यांना मेल करतो. मग आसपासच्या लोकांकडून पैसे जमा करतो आणि गाडी भाड्याने ठरवून त्याना कर्जतला त्यांना डॉ. वाटवानी यांच्याकडे घेऊन जोतो. आणि त्यानंतर कर्जतमध्ये त्यांच्यावर उपचार केले जातात. आणि मग बरे झाल्यावर ते आपले पत्ते सांगतात. आणि मग तिथून त्याना घरी पोहोचवण्याची प्रक्रीया पूर्ण केली जाते. माझ्याकडे बरे झालेल्यांना मी स्वत त्यांना त्यांच्या घरी सोडतो. ते मनोरुग्ण नसून मनोयात्री आहेत असं अमित यांना वाटतं.

अमितचे मित्र नामदेव सुतार सांगतात, हे एकटेच करत असल्याचं पाहून मला पण खंत वाटायला लागली. मलाही वाटल की आपण पण समाजासाठी यांच्यासोबत काहीतरी करण गरजेच आहे. हातभार थोडाफार लागला तर मलाही तेव्हढ पुण्य मिळेल. खूप मोठ काम आहे. सतीश शांताराम सांगतात, मी जॉबला होतो. तो प्रोजेक्ट होल्डवर असल्याने मी लक्ष दिल नाही. मग अचानक माझी आणि अमित यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे पाहून मला प्रेरणा मिळली.

Loading...
Loading...

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 09:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close