एटीएममध्ये 'हे' डिव्हाईस दिसलं तर सावधान,कारण...

तुमच्या कार्डचे डिटेल्स आणि पिनवर कुणी नजर तर ठेवत नाहीये ना... याची खात्री करुन घ्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2017 11:36 PM IST

एटीएममध्ये 'हे' डिव्हाईस दिसलं तर सावधान,कारण...

24 नोव्हेंबर : एटीममधून पैसे काढत असाल तर सावधान...तुमच्या कार्डचे डिटेल्स आणि पिनवर कुणी नजर तर ठेवत नाहीये ना... याची खात्री करुन घ्या...कारण अशा प्रकारे गैरव्यवहार करणारे कार्ड किलोनिंग डिव्हाईसच एटीएममध्ये बसवतायेत.

असंच एक डिव्हाईस मुंबईच्या अवनेश परबला कांदिवलीत एका एटीएममध्ये आढळलंय. नेहमीप्रमाणे अवनेश पैसे काढण्यासाठी कांदिवली स्टेशनजवळच्या इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये गेला होता. कार्ड मशिनमध्ये टाकलावर त्याला संशय आला.

एटीएममध्ये कार्ड क्लोन करण्यासाठी एक हिरव्या रंगाचं डमी डिव्हाईस होतं, कार्ड मशिनमध्ये टाकलं की, त्याचे डिटेल्स लगेच कॉपी होऊ शकतात, आणि पिन नंबर जाणून घेण्याससाठी पिन बोर्डच्या वर अशा पद्धतीतून कॅमेरा लावलेला होता, जेणेकरुन पटकन कुणाच्या लक्षात येणार नाही.

अवनेशनं पिन टाकायच्या आतंच त्याला गडबड असल्याची जाणीव झाली, आणि त्याचे पैसे वाचले. त्यानंतर तक्रार केल्यानंतर क्लोनिंग डिव्हाईस काढून टाकल्यानं इतरांचेही पैसे वाचवता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 11:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...