S M L

बापू@150 : 'फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच संभोग करावा', गांधीजींचा होता गर्भनिरोधकांना विरोध

आज सरकार गर्भनिरोधकांच्या वापराला प्रोत्साहन देत असलं आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत असं तरी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा या गोष्टींना सक्त विरोध होता.

Updated On: Sep 26, 2018 03:18 PM IST

बापू@150 : 'फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच संभोग करावा', गांधीजींचा होता गर्भनिरोधकांना विरोध

नवी दिल्ली, ता. 25 सप्टेंबर : महात्मा गांधी यांच्या विचारांनी सर्व जग प्रभावित झालं. आणि आजही त्यांचे विचार जगभर अभ्यासले जातात. मात्र काही बाबतीत ते नव्या पद्धतीच्या आणि मशिन्सच्या विरोधात होते हे पाहिलं की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असाच एक विषय म्हणजे गर्भनिरोधकांचा वापर आणि लोकसंख्या नियंत्रण. आज सरकार गर्भनिरोधकांच्या वापराला प्रोत्साहन देत असलं आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत असं तरी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा या गोष्टींना सक्त विरोध होता.

13 जानेवारी 1936 रोजी वर्धा रेल्वे स्टेशनवर एक अमेरिक महिला उतरली होती. त्यांना वर्ध्याला गांधीजींना भेटायला जायचं होतं. त्यांचं नाव होतं मार्गारेट सॅगर. अमेरिकेत गर्भनिरोधकांचा प्रसार करणाऱ्या तज्ज्ञ होत्या आणि त्यांना गर्भनिरोधकांबद्दल गांधींजींचे विचार जाणून घ्यायचे होते.

वर्धा स्टेशनवरून बैलगाडीत बसून त्या सेवाग्रामला बापू कुटीत पोहोचल्या. त्या दिवशी गांधीजींचं मौनव्रत सुरू होतं. त्यामुळे त्यांची महात्माजींशी फक्त भेट झाली बोलणं झालं नाही. सॅगर यांना राहण्यासाठी एक खोली देण्यात आली होती. आश्रमातला साधेपणा आणि दैनंदिन जीवन मात्र त्यांना फारसं रूचलं नाही. त्या आश्रमात आल्या तेव्हा गांधीजी शॉल पाघरून आसनावर खाली बसले होते.ते वातावण त्यांना खूपच रूक्ष वाटलं. मात्र गांधीजींभोवती त्यांना एक वलय जाणवलं. गांधीजींचा सच्चेपणा आणि त्याग यामुळं त्यांचा तो प्रभाव असावा असं त्यांचं मत होतं.  अमेरिकेतून येताना त्यांनी गांधीजींसाठी पुस्तकं आणि काही भेटवस्तूही आणल्या होत्या.

सॅगर यांनी 1917 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक गर्भनिरोधक क्लिनिक उघडलं होतं. महिलांमध्ये गर्भनिरोधकांबद्दल जागृती करण्याचं काम त्या करत होत्या.  महिलांच्या शरीरावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. त्यांच्या इच्छेविरूद्ध संभोग केला जावू नये असं त्यांचं मत होतं. त्यांच्या या चळवळीला त्या काळात प्युरिटन आणि कॅथलिकांनी जोरदार विरोध केला होता.

Loading...
Loading...

गांधींनी सॅगर यांचं स्वागत तर केलं मात्र...

भारतात गर्भनिरोधकांचा वापर व्हायला पाहिजे असं सॅगर यांना वाटत होतं. मात्र गांधींजींची या कामात फार काही मदत होईल असं त्यांचं मत तयार झालं होतं. सॅगर यांच्या वर्ध्यातल्या अनुभवांवर रॉबर्ट पेन यांनी "लाईफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी " या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात सॅगर यांचे सर्व अनुभव सविस्तर लिहिले आहेत.

गांधींजींचा कमालीचा साधेपणा, काही गोष्टींना त्याचबरोबर यांत्रिकीकरणाला असलेल्या विरोधाचं त्यांना खूपच आश्चर्य वाटत असे. पहिल्या दिवशी मौन असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांची आणि गांधीजींची चर्चा झाली.

गांधीजी मतांवर ठाम

या भेटीत सॅगर यांनी त्यांची सर्व मतं आणि दृष्टिकोन गांधीजींना सांगितला. सॅगर यांनी युक्तिवाद करत गर्भनिरोधकांच महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र गांधीजींवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते आपल्या मतांवर ठाम होते. त्यांच्या मते मुलं जन्माला घालण्याच्या उद्देशाशिवाय संभोग करू नये. असा संभोग करणं हे अनैतिक आहे असं त्यांची ठाम धारणा होती.

त्या व्यतिरिक्त केलेला संभोग हे पाप आहे असं त्यांच मत होतं. माणसांना तीन किंवा चार मुलं पाहिजे असतात त्यामुळं वैवाहिक आयुष्यात फक्त तीन ते चार वेळाच संभोग केला पाहिजे. गर्भनिरोधाचा एकमेव नैसर्गिक उपाय म्हणजे 'ब्रम्हचर्य' आहे असं त्यांचं ठाम मत होतं.

गांधीजी अतिशय शांतपणे, हळू आवजात पण ठामपणे आपली मतं मांडत असत. मात्र सैगर यांचं असं मत होतं की गांधीजी या मतांवर मनापासून विचारच करत नव्हते.

तर महिलांनी नवऱ्यांना सोडून द्यावं

गर्भनिरोधकांबाबतचे गांधीजींचे विचार हे स्वत:च्या अनुभवांवर आधारीत होते. नैसर्गिक उपायांनाही त्यांचा विरोध होता. वर्ध्यात कडूनिंबाची झाडं खूप होती आणि त्या भागात कापूसही होत असे. कडूनिंबाच्या रसात कापसाचा बोळा भिजवून तो गर्भनिरोधकासारखा वापरता येईल असं सॅगर यांनी त्यांना सांगून पाहिलं.

मात्र गांधीजी आपल्या मतांवर ठाम राहिले. महिलांनी आपल्या नवऱ्यांना नाही म्हणणं शिकलं पाहिजे. आपल्या इच्छेविरूद्ध त्यांने संभोगाची मागणी केली तर विरोध केला पाहिजे. आणि नवरा ऐकत नसेल तर त्याला साडून दिलं पाहिजे असंही त्यांचं मत होतं. सर्व दोष पुरूषांचाच आहे असे ते मानत होते.

 

ब्रम्हचर्याचं पालन

सॅगर म्हणतात आश्रमात ब्रम्हचर्येचं पालन केलं जात होतं. गांधीजींचा विलासी राहणी आणि संभोगाला का विरोध आहे हे मला कधीच कळलं नाही. चॉकलेट आणि संभोग हे ते एकाच तराजूमध्ये मोजत होते. जेव्हा वासना मरते तेव्हाच खरं प्रेम निर्माण होतं असं गांधीजींच मत होतं. सॅगर यांनी या विषयावर गांधीजींशी प्रदीर्घ चर्चा केली मात्र ते आपल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहिले.

 

शिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 07:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close