News18 Lokmat

जेवणाच्या टेबलापायी गायकवाडांमुळे 2 कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

भाजप खासदार सुनील गायकवाड यांना जेवणासाठी टेबल मिळायला पाच मिनिट उशीर झाल्याने भडकलेल्या गायकवाड यांनी इतका थयथयाट केला की दोन गरीब कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 11:10 PM IST

जेवणाच्या टेबलापायी गायकवाडांमुळे 2 कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

कौस्तूभ फलटणकर, नवी दिल्ली

21 जुलै : लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांना जेवणासाठी टेबल मिळायला पाच मिनिट उशीर झाल्याने भडकलेल्या गायकवाड यांनी इतका थयथयाट केला की दोन गरीब कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली. ही घटना मंगळवारी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात घडली. खासदार सुनील गायकवाड मात्र आपल्या कृतीचं समर्थन करतायत.

झालंय असं की, नव्या महाराष्ट्र सदनात व्हीआयपींसाठी एक डायनिंग रूम आणि एक जनरल डायनिंग रूम अशी व्यवस्था आहे. लातूरचे भाजपचे खासदार सुनील गायकवाड हे आपल्या मुलगी आणि जावयासोबत इथं जेवण करण्यासाठी आले होते. पण व्हीआयपी डायनिंग रूम बुक असल्याने ते जनरल डायनिंग रूममध्ये गेले. तिथे ज्या टेबलवर ते बसले ते बुक आहे, हे वेटरनी त्यांना सांगितलं मग काय...सुनील गायकवाड यांचा पाराच चढला

पण मी माझ्या प्रतिष्ठेसाठी किंवा इगोमुळे असं वागलो नसून वेटर माझ्याशी मुजोरपणे बोलल्याचं खासदार सुनिल गायकवाड यांचं म्हणणं आहे.

Loading...

निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी गायकवाड यांच्या तक्रारीची दखल घेऊन वेटर नरेश आणि मॅनेजर आशीष मथनकर याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तर कॅन्टीन व्यवस्थापनाला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्याक्षणी जे घडलं त्यावरून गायकवाड यांना राग येणं साहाजिक असलं तरी दोघांची नोकरी घालवून गायकवाड यांनी काय साधलं? एकीकडे पंतप्रधान व्हीआयपी कल्चर नको म्हणून भूमिका घेतात तिथेच भाजपच्या खासदारांची ही वर्तणूक नक्कीच अपेक्षीत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...