प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी पण चर्चा 'बाहुबली 2'ची !

प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी पण चर्चा 'बाहुबली 2'ची !

एका आरोपात खडसेंचा राजीनामा मग प्रकाश मेहातांना वेगळा न्याय का ? ही विरोधाची मागणी येताच 'बाहुबली टू'ची चर्चा चांगलीच रंगली.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई

02 आॅगस्ट : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे विरोधकांच लक्ष ठरले. एका मागून एक प्रकरणं समोर आणत विरोधकांनी मेहातांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजकारणात 'बाहुबली 2 टू' सुरू झाल्याची चर्चा रंगली.

प्रकाश मेहता राजीनामा द्या... या घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगल्याच गाजल्या. ताडदेव मिल, एस डी डेव्हलपर  प्रकरण, घाटकोपर भूखंड, असे एकामागे एक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणत मेहतांना अडचणीत आणलं. मेहतांसोबतच विरोधकांनी सरकारचीही कोंडी केलीय.

मुख्यमंत्र्यांना ताडदेव प्रकरण अवगत केलं होतं असा दावा प्रकाश मेहतांनी केलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मात्र हे प्रकरण माहीत नसल्याचं सभागृहातच स्पष्टीकरण दिलंय. तर आपल्या मागे पक्षात काही लोक षड्यंत्र करत असल्याचं पत्र व्हायरल झाल्यानं मेहता आणखी अडचणीत आलेत. मात्र हे पत्र काढलं नसल्याचंही मेहतांचं म्हणणं आहे.

एका आरोपात खडसेंचा राजीनामा मग प्रकाश मेहतांना वेगळा न्याय का ? ही विरोधाची मागणी येताच 'बाहुबली टू'ची चर्चा चांगलीच रंगली.

या लढाईत कोण जिंकणार हे सांगण कठीण आहे पण  प्रकाश मेहतांच्या नावातच "पीएम" आहे अशी एका मंत्र्यांनं दिलेली बोलकी प्रतिक्रिया सर्वकाही सांगून जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 08:54 PM IST

ताज्या बातम्या