राज्यात बिअर, सॉफ्ट ड्रिंक महागणार ?

राज्यात बिअर, सॉफ्ट ड्रिंक महागणार ?

राज्य सरकारने उद्योगासाठीच्या पाण्यावरचा कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश लवकरच काढले जाणार आहेत.

  • Share this:

रफीक मुल्ला, मुंबई

23 सप्टेंबर : राज्य सरकारने उद्योगासाठीच्या पाण्यावरचा कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश लवकरच काढले जाणार आहेत. हा वाढलेला कर कधीपासून घ्यायचा याचा अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रस्तावित वाढीमुळे येणाऱ्या काळात पाण्याची बाटली, सॉफ्ट ड्रिंक आणि बिअर महागणार आहेत.

राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने पाण्यावरील अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतलाय. जल संसाधने नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर हा प्रस्ताव आहे. त्यावर संबंधित विभागांच्या प्रतिक्रिया घेऊन अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  उद्योगासाठी प्रति 10 हजार लिटर पाण्यावर 10 ते 20 रुपयांची वाढ, तर मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि बिअर प्लांट यांच्यासाठी सहा पटीने कर वाढवण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे जो कर आधी 45 ते 90 रुपये होता तो आता, 200 ते 400 रुपये होणार आहे."

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रकल्पांना यातून वगळण्यात आले आहे. त्याठिकाणी प्रति 10 हजार लिटरला 40 पैसे एवढाचं कर ठेवण्यात आलाय. मात्र, ग्रामीण भागातून उत्पादन शहरी भागात विक्रीसाठी येत असेल तर 20 टक्के कर वाढवण्यात येणार आहे.

नवीन प्रस्तावानुसार शेतीचे पाणी उद्योगासाठी वापरणाऱ्यांना 16 टक्क्याने कर द्यावा लागणार आहे.

उद्योगाच्या पाण्यावरील करवाढ

- 10 हजार लीटरसाठी 10 ते 20 रुपयांची वाढ

- मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक, बिअर प्लांटसाठी सहापट वाढ

- जो कर पूर्वी 45 ते 90 रुपये होता, तो आता 200 ते 400 रुपये

First published: September 23, 2017, 11:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading