S M L

कर्जमाफीच्या निर्णयामुळे फडणवीस सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात !

सरकारनं कर्जमाफी जाहीर केली पण त्याचं श्रेय काही सरकारला मिळालं नाही. उलट कर्जमाफीच्या निकषांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2017 06:05 PM IST

कर्जमाफीच्या निर्णयामुळे फडणवीस सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात !

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

22 जून : सरकारनं कर्जमाफी जाहीर केली पण त्याचं श्रेय काही सरकारला मिळालं नाही. उलट कर्जमाफीच्या निकषांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

एखादा निर्णय झाल्यावर त्याचं श्रेय सरकारला जातं. पण शेतकरी कर्जमाफीसारखा मोठा निर्णय घेतल्यानंतरही राज्य सरकारला त्याचं श्रेय मिळताना दिसत नाही. उलट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकषांवरुन सरकारवरच टीकेचे बाण सुटले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न हाताळताना यश आलं नाही म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुढं झाले. दहा हजार रूपयांची उचल आणि सरसकट कर्जमाफीच्या निकषांवरुन सरकारनं काढलेला जीआर त्यांना बदलावा लागला. या सगळ्या कोलाहलात शेतकरी कर्जमाफीचं श्रेय मात्र सरकारला मिळालेलं दिसत नाही. त्यामुळे यश मिळालं तर टीमचं आणि अपयश मिळालं तर त्याचा धनी मी असं म्हणण्याची वेळ चंद्रकांत पाटलांवर आलीये.

शेतकरी कर्जमाफीचं यश ना भाजपला मिळालं. ना शिवसेनेला, ना विरोधकांना त्याचं श्रेय मिळालं. निर्णय मोठा घेतला पण त्याच्या अंमलबजावणीचा घोळ झाल्यानं सरकारची मात्र फजिती झाल्याचं स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 05:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close