...आणि मुख्यमंत्र्यांनी 'संप'वला !

...आणि मुख्यमंत्र्यांनी 'संप'वला !

जयाजी सूर्यवंशी आणि त्यांच्या गटानं जो निर्णय घेतला तो ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पचणी पडलेला नाही. त्यामुळेच जयाजी सूर्यवंशी सरकारला शरण गेल्याची टीका सगळीकडे होतेय. पण एक निश्चित मुख्यमंत्री हा संप संपवण्यात यशस्वी झाल्याचं चित्रं आहे.

  • Share this:

मंगेश चिवटे,मुंबई

03 जून : महाराष्ट्राची सकाळ झाली ते संप मिटल्याचं बातमीनं. खरं तर झोपताना आणखी किती दिवस हा संप चालेल याची चर्चा सुरु होती आणि अचानक रात्रीतून असं काय घडलं की संप संपला हे क्षणभर कळतच नव्हतं.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलेल्या शेतकऱ्यांचं हे वक्तव्य ऐकलं त्यावेळेस संपात असलेल्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. कारण मागणी संपूर्ण कर्जमाफीची होती, उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्याची होती त्याचा कुठलाच उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात नव्हता. उलट जे आज ना उद्या होणारच होतं त्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

दोन तीन महिन्यांपूर्वी पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली होती. त्यावेळेस जयाजी सूर्यवंशी त्यात नव्हते. कालचं शिष्टमंडळ ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटायला आलं त्यावेळेस मात्र जयाजी हेच संपाचे नेते झाले होते. हे शिष्टमंडळ मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटलं पण त्यातून किसान सभेचे नेते नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती काम करतात हेही खरं तर रात्रीच्या घडामोडींनी दिसून आलं. पहाटे तीन वाजता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत संप मिटल्याची घोषणा केली. जयाजी सूर्यवंशी तर आनंद साजरा करण्याच्या हिशेबात होते.

जयाजी सूर्यवंशी आणि त्यांच्या गटानं जो निर्णय घेतला तो ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पचणी पडलेला नाही. त्यामुळेच जयाजी सूर्यवंशी सरकारला शरण गेल्याची टीका सगळीकडे होतेय. पण एक निश्चित मुख्यमंत्री हा संप संपवण्यात यशस्वी झाल्याचं चित्रं आहे.

First published: June 3, 2017, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading