विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

राज्यात यावर्षी ८२.७३ लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना ३,६२२.११ कोटी दिले.

  • Share this:

नागपूर, 29 जून : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकाराने आणलेली कृषी विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच जास्त फायदा करून देत असल्याच पुढे आलं आहे. 'प्रधानमंत्री फसल बिमा' योजनेच्या अहवालातच ही बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे संयोजक विवेकानंद माथने यांनी या अहवालातील जी आकडेवारी सादर केली ती धक्कादायक आहे.

VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ!

शेतकऱ्याकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठीचे प्रिमियम पीककर्जातून कापले जाते शिवाय राज्य आणि केंद्र सरकार यासाठी अनुदान देते. विमा कंपन्यांना हा निधी मिळाल्यानंतर यातून शेतकऱ्यांना नुकसानभरापाई दिली जाते. पण शेतकऱ्यांएवजी विमा कंपन्यांनाच वर्षाकाठी १० हजार कोटींचा फायदा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

पीकविम्याचे २०१६-१७ मधील वास्तव

५.७५ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढण्यात आला.

त्यासाठी विमा कंपन्यांना तब्बल २२,१८० कोटी प्रीमियम आणि राज्य/ केंद्र शासनाच्या अनुदानापोटी मिळाले.

त्यावर्षी पीक विम्याचे एकूण १२,९४८ कोटीचे दावे विमा कंपन्यांनी मंजूर केले. त्यामुळे विमा कंपन्यांना ९,२३२ कोटी लाभ झाला.

पीकविम्याची २०१७-१८ मधील स्थिती

असाच प्रकार २०१७-१८ या वर्षातही घडण्याची शक्यता आहे.

५.१६ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढला गेला आहे.

त्यासाठी विमा कंपन्यांना २४,७१० कोटी दिले आहेत.

यापैकी खरीप २०१७ साठी विमा कंपन्यांनी १८ जूनपर्यंत ८७२४ कोटींचे दावे मंजूर केले आहे. रबी हंगामाचे दावे ६००० कोटी होतील.

यावर्षीही एकूण दावे १४,००० कोटीचे असण्याची व त्याद्वारे विमा कंपन्यांना १०,००० कोटी नफा होण्याची शक्यता आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

राज्यात यावर्षी ८२.७३ लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना ३,६२२.११ कोटी दिले. विमा कंपन्यांनी २१६२.४७ कोटींचे दावे मंजूर केले आणि १४६० कोटी नफा कमावला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात 'प्रधानमंत्री फसल बिमा' योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 05:52 PM IST

ताज्या बातम्या