निष्ठावंत माधव भांडारींएेवजी प्रसाद लाड यांना का उमेदवारी ?

भाजपचे निष्ठावंत प्रवक्ते माधव भांडारी यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजपच्या गोटात लाड यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पसरली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2017 02:23 PM IST

निष्ठावंत माधव भांडारींएेवजी प्रसाद लाड यांना का उमेदवारी ?

27 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रकाश लाड यांना उमेदवारी देऊन नारायण राणेंचा पत्ता कट केला. पण, भाजपचे निष्ठावंत प्रवक्ते माधव भांडारी यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजपच्या गोटात लाड यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पसरली आहे.

विधान परिषदेसाठी भाजपचे निष्ठवंत तसंच भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती.  विशेष म्हणजे माधव भांडारी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण, अचानक रविवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीत प्रसाद लाड यांचं नाव निश्चित झालं. याआधीही  अनेकदा भांडारींनी तिकीट नाकारलं गेलंय. पण प्रत्येक वेळी भांडारींच्या पदरी निराशाच आली.

प्रसाद लाड यांना का उमेदवारी ?

प्रसाद लाड हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्यांच्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जबाबदारी आहे. प्रसाद लाड हे

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसंच लाड हे मुंबई बँकेचे संचालक आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनामधील वरिष्ठांसोबत लाड यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी भांडारीऐवजी लाड यांना पुढं केलं. तसंच लाड यांची उद्योगपती म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळेच की काय लाड यांना उमेदवारी मिळाली अशी चर्चा रंगलीये.

Loading...

'मी निष्ठावंत कार्यकर्ता'

दरम्यान, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. माझ्या नावाची चर्चा का झाली हे मला माहिती नाही. पण मी पक्षाचा 1980 पासूनचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया माधव भांडारींनी दिली.

मात्र, भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या आयारामांचे 'लाड' होताय आणि निष्ठावंताना डावललंय जातंय अशी नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...