गेल्या 10 महिन्यात राज्यात 2414 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही वाढ !

गेल्या 10 महिन्यात राज्यात 2414 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही वाढ !

तुलनेत यावर्षी आत्महत्येचा वेग अधिक दिसून येतो. या भयंकर स्थितीबाबत सरकार अवगत आहे.

  • Share this:

रफीक मुल्ला, मुंबई

21 नोव्हेंबर : महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी राज्यातल्या शेतकऱ्यांना अजिबात दिलासा देणारी ठरलेली नाही. सरकारच्याच आकडेवारीनुसार कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर्षी 10 महिन्यात 2414 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळ आणि मालाला भाव नसणं, अशा एक ना दोन असंख्य अडचणींना ग्रासलेला शेतकरी, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही सावरू शकलेला नाही.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या

ऑक्टोबर - 1254 शेतकऱ्यांच्या आत्महत्या   

जानेवारी ते मे ( 5 महिन्यात ) -1160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दर महिन्याला सरासरी 240 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2015 साली 3228

2016 साली 3063  

तुलनेत यावर्षी आत्महत्येचा वेग अधिक दिसून येतो. या भयंकर स्थितीबाबत सरकार अवगत आहे. अलीकडे घेतलेल्या निर्णयपालिकडे सरकारकडे यावर काही उत्तर नाही.

सरकार, विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या संघटना सर्वजण शेतकऱ्यांच्या स्थिती आणि आत्महत्यावर दररोज बोलत आहेत. मात्र नेमक्या उपाययोजना काहीच होताना दिसत नाहीत. त्यामुळे हा विषय केवळ राजकीय फायद्यासाठी उचलला जातो हा एकमेव निष्कर्ष निघतो.

दरम्यान, 25 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीचा घोळ संपेल आणि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल असं सहकारमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading