लव्ह,सेक्स आणि बदला !, पुण्यात 'रिव्हेंज पाॅर्न'चे 68 गुन्हे दाखल

लव्ह,सेक्स आणि बदला !, पुण्यात 'रिव्हेंज पाॅर्न'चे 68 गुन्हे दाखल

"प्रेमभंग झालेल्यासोबत ना राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी..."

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

15 नोव्हेंबर : प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात,आपल्या जोडीदाराला नग्न फोटोस पाठवतात. मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा,जोडप्याचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडून याच व्हिडिओ,फोटोचा गैरवापर केला जातोय यातूनच जन्म घेतलाय रिव्हेंज पाॅर्नने... सांस्कृतिक नगरी पुण्यात तब्बल 68 गुन्हे दाखल झाले आहे.

प्रेमभंग झालेल्यासोबत ना राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणयदृष्य, एकमेकांना पाठवलेले नग्न फोटो, सोबतचे  व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात. एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अश्या मार्गाचा अवलंब करणं याला  सायबरक्राईमच्या भाषेत म्हणतात 'रिव्हेंज पॉर्न'... या रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्याने ने सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय. पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे रोज नवेनवे गुन्हे दाखल होत आहेत.

'रिव्हेंज पॉर्न'च्या या गुन्ह्यांच्या या नव्या संकल्पनेमध्ये अनेक तरुणांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. गेल्या वर्षभरात जानेवारी पासून पुणे पोलिसांकडे रिव्हेंज पाॅर्नचे ६८ गुन्हे दाखल झाले आहे. आय टी ऍक्टच्या कलम ६७ नुसार या प्रकारच्या गुन्ह्याला पाच ते सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे पण त्याहीपेक्षा रिव्हेंज पॉर्न च्या या प्रकारामुळे अनेक विवाहित तरुणींची वैवाहिक आयुष्य उध्वस्त झालीयेत.

'रिव्हेंज पॉर्न'च्या या प्रकारांमुळे सायबरक्राईम च्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालीये. सोशल मीडिया च्या भस्मासुराचा भेसूर चेहरा या निमित्ताने उघड होतोय. भावनेच्या आहारी जाऊन संपर्कच उत्तम माध्यम असलेलं सोशल मीडिया कशापद्धतीने वापरलं जायला हवं याबद्दल जागरूकता निर्माण करण जास्त आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 09:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading