महाएक्झिट पोलमध्ये भाजपचा बोलबाला, काँग्रेसच्या जागा वाढतील ?

या एक्झिट पोलमध्ये प्रमुख वृत्तवाहिन्यांनी भाजपचं पारड जडं असल्याचं भाकित वर्तवलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2017 06:34 PM IST

महाएक्झिट पोलमध्ये भाजपचा बोलबाला, काँग्रेसच्या जागा वाढतील ?

14 डिसेंबर : संपूर्ण देशाचं लक्ष्य लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं मतदान आज संपलंय. त्यामुळे आता उत्सुकता लागली ती निकालाची....त्यापूर्वी काही वृत्तवाहिन्यांनी गुजरातच्या निकालाबाबत महाएक्झिट पोल दिलाय.

या एक्झिट पोलमध्ये प्रमुख वृत्तवाहिन्यांनी भाजपचं पारड जडं असल्याचं भाकित वर्तवलंय. 182 जागांपैकी टाइम्स नाऊ-VMR ने भाजपला 109 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आणि इतर पक्षांना फक्त 3 जागा मिळतील.

तर एबीपी आणि सीएसडीसीने केलेल्या सर्व्हेनुसार भाजपला 91 ते 99 जागा मिळतील आणि काँग्रेसला 78-86 जागा मिळणार असा अंदाज वर्तवलाय. तर इतर पक्षांना 3 ते 7 जागा मिळतील.

रिपब्लिक टीव्हीच्या आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 108 जागा दिल्या आहे तर काँग्रेसला 74 जागा मिळतील आणि इतरांना भोपळा मिळेल असं भाकित वर्तवलंय.

सहारा समयने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 110 ते 120 जागा दिल्या आहे. तर भाजपच्या वाट्याला 65 ते 75 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय.

Loading...

तर कालच स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी आपला ओपनियन पोल टि्वटकरून जाहीर केलाय. योगेंद्र यादव यांनी तीन शक्यता वर्तवल्या असून यामध्ये त्यांनी भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.  काँग्रेसला 93 ते 113 जागा मिळतील असा अंदाज यादव यांनी व्यक्त केलाय. भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल असं भाकीतही यादव यांनी वर्तवलंय.

 

महाएक्झिट पोल : गुजरात

                                         भाजप             काँग्रेस               इतर

टाइम्स नाऊ-VMR              109             70                    03

ABP-CSDS                    91-99            78-86           03-07

रिपब्लिक टीव्ही                  108               74                       00

सहारा समय                   110-120         65-75                02-04

टीव्ही 9                              108                  74                          0

इंडिया टुडे                       99 ते 113             68 ते 82                 1 ते 4

गुजरात विधानसभा - 2012 बलाबल (एकूण जागा - 182)

भाजप - 115

काँग्रेस - 61

गुजरात परिवर्तन पार्टी - 2

जेडीयू - 1

राष्ट्रवादी काँग्रेस - 2

अपक्ष - 1

जातनिहाय मतांची टक्केवारी

ब्राह्मण - 8%

पाटीदार - 14 %

ओबीसी - 40 %

मुस्लिम - 9 %

राजपूत - 5%

 

गुजरात निवडणुकीतील प्रमुख लढती

1. विजय रुपानी (मुख्यमंत्री) विरुद्ध इंद्रनील राजगुरु (काँग्रेस)

    मतदारसंघ - राजकोट (पश्चिम)

2. नितीन पटेल (उपमुख्यमंत्री) विरुद्ध जीवा पटेल (काँग्रेस)

मतदारसंघ - मेहसाणा

3. अल्पेश ठाकूर (काँग्रेस) विरुद्ध लवजी ठाकूर (भाजप)

मतदारसंघ - राधनपूर

4. जिग्नेश मेवानी (अपक्ष-काँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध विजय चक्रवर्ती (भाजप)

मतदारसंघ - वडग्राम, बनासकांठा

5. भूपेंद्र चुडासमा (शिक्षण मंत्री) विरूद्ध

अशिवन राठौड (काँग्रेस)

मतदारसंघ - धोलका

6. शैलेष मेहता (भाजप) विरूद्ध

सिद्धार्थ पटेल (माजी प्रदेशाध्यक्ष,काँग्रेस)

मतदारसंघ -डभोई

निवडणुकीतले प्रमुख मुद्दे

- पाटीदार समाजाचं आंदोलन

- अल्पेश ठाकूरच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा असंतोष समोर आला

- उना प्रकरणानंतर जिग्नेश मेवानीचं नेतृत्व समोर आलं

- नोटबंदी

- जीएसटी

- 57 टक्के मतदार हा शेतीशी निगडित

प्रचार सभेतले मुद्दे

- घराणेशाही विरुद्ध विकास

- मुद्दा हिंदुत्वाचा

- मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त विधान

- जातीयवादाचा वरचष्मा

- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील आरोप

- निवडणूक आयोगाची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...