S M L

विधान परिषदेसाठी अभद्र युतीचं पेव, क्रॉस वोटिंगचंही ग्रहण!

. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपनं या निवडणुकीत एकत्र संसार न करता विरोधकांना मदत करत एकमेकांना खिंडीत गाठण्याचंच काम केलंय.

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 09:31 PM IST

विधान परिषदेसाठी अभद्र युतीचं पेव, क्रॉस वोटिंगचंही ग्रहण!

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

मुंबई, 21 मे : सगळ्यात श्रीमंत निवडणूक म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान झालं.  राज्यात सहा जागांवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीला क्रॉस वोटिंगचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात अभद्र युतीचं पेव फुटल्याचं समोर आलंय. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपनं या निवडणुकीत एकत्र संसार न करता विरोधकांना मदत करत एकमेकांना खिंडीत गाठण्याचंच काम केलंय.

राज्यात विधान परिषेदेसाठीच्या सहा जागांवर मतदान पार पडलं यात वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, आणि अमरावती या जागेवर भाजपला विजयाची खात्री आहे. तर उरलेल्या चार जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलीय.या ठिकाणी भाजप निर्णायक भूमिकेत आहे.

विधान परिषदेचा आखाडा

 नाशिक

Loading...

- शिवसेना पहिल्या क्रमांकावर असला तरी त्यांना भाजपची साथ महत्वाची

- पालघर लोकसभा निवडणुकीतील सेनेच्या खेळीनं नाराज भाजपची राष्ट्रवादीला साथ

कोकण

- राष्ट्रवादीच्या तटकरेंना राणेंची साथ

- भाजप आणि शेकापनं राष्ट्रवादीला मदत केल्यानं शिवसेनेची अडचण

परभणी

- परभणीत काँग्रेसला निवडणूक सुकर होण्याची चिन्ह

लातूर-बीड-उस्मानाबाद

- मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई

- रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की

- राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मिळाला मतदानाचा अधिकार

- काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका

- बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपला साथ

- शिवसेनेनं कुठलीही भूमिका न घेतल्याचा भाजपला फटका

- विधानपरिषद निवडणुकीचे पडसाद आगामी राजकारणातही उमटण्याची चिन्ह आहेत.

निवडणुकांचं मतदान पाहता दोन जागा भाजप, दोन राष्ट्रवादी, एक जागा काँग्रेसला अपेक्षित आहे. तर एकाही जागेवर शिवसेनेला यश मिळालं नाही तर आगामी काळात भाजप विरोधात सर्व पक्ष ही संकल्पना धूसर होईल आणि तोच भाजपला दिलासा मिळणार आहे.

कोणत्या प्रमुख उमेदवारांमध्ये ही प्रतिष्ठेची लढाई ?

- विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक

- स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघातून निवडणूक

   

1)लातूर-बीड-उस्मानाबाद     

- सुरेश धस(भाजप)

अशोक जगदाळे (राष्ट्रवादी)

   

2)सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड   

- अनिल तटकरे (राष्ट्रवादी)

- राजीव साबळे (शिवसेना)

3)नाशिक    

- नरेंद्र दराडे -शिवसेना

- अॅड .शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

-  परवेझ कोकणी (अपक्ष)

 

4)अमरावती

- प्रविण पोटे-पाटील (भाजप)

- माधव गडियाल(काँग्रेस)

5)परभणी-हिंगोली    

- सुरेश देशमुख (काँग्रेस)

- विप्लव बाजोरिया (शिवसेना)

6)वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

- इंद्रकुमार सराफ(काँग्रेस)

- रामदास आंबटकर (भाजप )

विधानपरिषद मतदानाची टक्केवारी

नाशिक- 100टक्के​

बीड-लातूर-उस्मानाबाद-100 टक्के (1005 पैकी 1004) ​

सिंधुदूर्ग - 99 टक्के मतदान

अमरावती- 100 टक्के

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर-99.35 (308 पैकी 306)

परभणी-हिंगोली -99.60 (501 पैकी 499)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 09:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close