बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी पोलिसाने जबरदस्तीने केलं पीडितेचा गर्भपात

या प्रकरणातले आरोपी फरार असून पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2017 08:50 PM IST

बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी पोलिसाने जबरदस्तीने केलं पीडितेचा गर्भपात

नितीन बनसोड, लातूर

17 नोव्हेंबर : लातूरमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानंच अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने गर्भपात केलाय. या प्रकरणातले आरोपी फरार असून पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीये.

लातूर जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन मुलीचं आयुष्यचं उद्धवस्त झालंय. अत्याचारग्रस्त मुलीला पोलीस अधिकाऱ्याने जबरदस्तीनं गर्भपात करायला लावल्याचा प्रकार लातूरच्या देवणी तालुक्यात घडलाय. ऊस तोडणी कामगाराच्या घरातील या पीडित मुलीला मुकादमानं फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर ही पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकाराची देवणी पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलीला मदत करण्याऐवजी पोलीस अधिकारी कृष्णदेव पाटील यानं तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. शिवाय तिच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचं आमिषही दाखवलं.

पीडित मुलीच्या कर्मकहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची बदली केलीये. पण या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. आरोपींना पाठिशी घालून पीडित मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...