S M L

खासदारांनी केलं कन्यादान, नेते-पत्रकार झाले वऱ्हाडी ; अशीही एका लग्नाची वेगळी गोष्ट !

लातूर शहरात आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. एका अनाथ मुलीसाठी शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातले लोक एकत्र आलेत.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2017 11:55 PM IST

खासदारांनी केलं कन्यादान, नेते-पत्रकार झाले वऱ्हाडी ; अशीही एका लग्नाची वेगळी गोष्ट !

नितीन बनसोड, लातूर

28 जून : लातूरमध्ये एक लक्षवेधी लग्नसोहळा पार पडला. एका अनाथ मुलीसाठी लातुरातील सगळे दिग्गज एकत्र आले आणि तिचा विवाह पार पडला.

लातूर शहरात आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. एका अनाथ मुलीसाठी शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातले लोक एकत्र आलेत. जिल्ह्याच्या खासदारांनी अनाथ मुलीचं कन्यादान केलं तर , सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलीच्या मामाची भूमिका बजावली. इतकंच काय तर जिल्ह्यातले पत्रकार आणि सर्व राजकीय व्यक्ती वऱ्हाडी बनले आणि संपन्न झाला एक अनोखा विवाह सोहळा...हे लग्न मोठ्या व्हीव्हीआयपीच्या मुलीचं असेल हे सांगायला ही दृश्य पुरेशी वाटतात. पण तसं काही नाहीये हा...हे लग्न पूनम नावाच्या अनाथ मुलीचं आहे. पूनम ही लातुरातल्या एका अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. आश्रमाला दिलेल्या एका भेटीत त्यांनी पूनमला पाहिलं. त्यानंतर पूनमला त्यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. शिवाय पूनमच्या लग्नाचीही जबाबदारी उचलली.

ज्या विकास गायकवाडशी पूनमचं लग्न झालं तो आणि त्याचे वडील खूप खुश आहेत.

लोकप्रतिनिधींच्या अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांना दुर्दैवांने की म्हणाना कृत्रिमतेची किनार असते..पण सुनील गायकवाडांनी स्वंयप्रेरणेनं एका अनाथ मुलीची जबाबदारी स्वीकारुन तिचं लग्न लावून दिल्यानं त्यांचं कौतुक होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 11:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close