S M L

परदेशी पर्यटक भारतात येण्याची संख्या वाढली

2017 मध्ये तब्बल 20.2 टक्क्यांनी अधिक ही वाढ नोंदवली गेली आहे. फक्त परदेशी पाहुण्यांकडून देशाला 1 लाख 75 हजार कोटींची कमाई करता आली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Feb 2, 2018 12:12 PM IST

परदेशी पर्यटक भारतात येण्याची संख्या वाढली

02 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षात परदेशी पर्यटक भारतात येण्याची संख्या वाढली आहे. 2017 मध्ये तब्बल 20.2 टक्क्यांनी अधिक ही वाढ नोंदवली गेली आहे. फक्त परदेशी पाहुण्यांकडून देशाला 1 लाख 75 हजार कोटींची कमाई करता आली आहे.

भारताच्या निसर्ग सौंदर्याची, विविधतेची, इथल्या संस्कृतीची भुरळ कायमच जगावर पडलेली आहे. भारताचं हे देखणं रूप पाहाण्यासाठी परदेशी पर्यटकांचे पाय मोठ्या संख्येनं भारतभूमीकडे वळू लागलेत. कधी काळी असुरक्षित वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात न जाण्याचा सल्ला दिला जायचा. पण ते दिवस आता राहिले नाहीत. परदेशी पर्यटकांच्या प्रतिसावरून असा निष्कर्ष आपल्याला सहज काढता येईल.

2017 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 15.2 टक्क्यापेक्षा अधिक परकीय पर्यटकांची भारताला भेट

उत्पनाच्या बाबतीत तब्बल 20.2 टक्क्यांची वाढ झालीय

2017 ची फक्त परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून मिळालेली रक्कम 1 लाख 75 हजार कोटींच्या घरात

अतुल्य भारतसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सरकारी पातळीवरून पर्यटनाला प्राधान्य दिलं जातंय. त्याचाच परिणाम परदेशी पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येत दिसतोय. पण अजूनही पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न कमी असल्याचं जाणकार सांगतात. कारण भौगोलिक रचनेसह सर्व बाबतीत भारत सौंदर्यानं संपन्न आहे.

एकूण GDP मध्ये 6.88 एवढा पर्यटनाचा वाटा आहे. आणि या क्षेत्रात सध्या 12.36 टक्के एवढा रोजगार निर्माण झालाय. हे दोन्ही आकडे भविष्यात वाढून अतुल्य कामगिरीपर्यंत पोहोचतील अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close