S M L

नाशिकमध्ये गेल्या 2 आठवड्यात आठ हत्या

नाशिकमध्ये तोडफोड जाळपोळ आणि हत्यासत्र सुरूच आहेत. दोन आठवड्यात नाशकात आठ हत्या झाल्यात. त्यामुळे देवभूमी नाशिक गुन्हेगारांसाठी नंदवन झालंय.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 11:16 PM IST

नाशिकमध्ये गेल्या 2 आठवड्यात आठ हत्या

प्रशांत बाग, नाशिक

31 मे : नाशिकमध्ये तोडफोड जाळपोळ आणि हत्यासत्र सुरूच आहेत. दोन आठवड्यात नाशकात आठ हत्या झाल्यात. त्यामुळे देवभूमी नाशिक गुन्हेगारांसाठी नंदवन झालंय.

शांत शहर समजल्या जाणाऱ्या नाशिकची शांतता गेल्या काही वर्षांत भंग पावलीये. नाशिकमध्ये जाळपोळ, हत्या आणि मारामाऱ्या ही नित्याचीच बाब झालीये. गेल्या दोन आठवड्यात नाशिक शहरात एक दोन नव्हे तब्बल आठ जणांच्या हत्या झाल्यात. मंगळवारी एकलहरे भागात हर्षदा आहिरे नावाच्या तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी तिच्या प्रियकराला अटक झाली न झाली तोच आणखी एक हत्या झाली. नाशिकच्या रामवाडी परिसरात अरुण बर्वे या महापालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडलाय. त्याची हत्या करण्यात आलीये. जाळपोळ, तोडफोड आणि हत्यांमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण आहे.नाशिकच्या गुन्हेगारीकरणाबाबत पोलिसांना मात्र काहीच वाटत नाही. पोलीस नाशिकची कायदासुव्यवस्था अबाधित असल्याचं सांगतात.

नाशिककर दहशतीत आहेत. नेते डॉनच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या मेजवान्या झोडतायेत. अशावेळी पोलीसही हातावर हात धरुन बसले तर नाशिककरांनी शहरात कुणाच्या भरवशावर फिरायचं असा सवाल उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 11:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close