पाच वर्षात राज्यात ७८ हजार ३१७ जणांचे अपघाती मृत्यू,सर्वाधिक अपघात पुण्यात !

एका वर्षात पुण्यात तब्बल १२२६ जणांचा अपघाती मृत्यू झालाय तर राज्यात तब्बल १३ हजार ६८२ जणांचा अपघाती मृत्यू झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 06:13 PM IST

पाच वर्षात राज्यात ७८ हजार ३१७ जणांचे अपघाती मृत्यू,सर्वाधिक अपघात पुण्यात !

वैभव सोनवणे, पुणे

28 डिसेंबर : राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने जाहीर केलेल्या २०१५ आणि १६ च्या आकडेवारीनुसार राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू झालेत. सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीच्या अपघातात झाले आहेत. एका वर्षात पुण्यात तब्बल १२२६ जणांचा अपघाती मृत्यू झालाय तर राज्यात तब्बल १३ हजार ६८२ जणांचा अपघाती मृत्यू झालाय.

राज्यातील रस्त्याची दुरावस्था, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन आणि हेल्मेट सारख्या सुरक्षा उपकरणांचा वापर न करणे, यामुळे राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू पुण्यात झालेत. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीच्या अपघातांमध्ये झालेत. या मृत्युंमध्ये जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल १२४२ अपघाती मृत्यू झालेत तर शहर हद्दीमध्ये हा आकडा ४१७ इतका आहे.

 राज्यातल्या अपघाती मृत्यूची आकडेवारी

२०११ ते २०१६ या पाच वर्षात राज्यात  ७८ हजार ३१७ जणांचे अपघाती मृत्यू

Loading...

राज्यात एकूण ३७ हजार ८८६ अपघात

सर्वाधिक अपघातांचं प्रमाण औरंगाबाद २४७०

सर्वाधिक अपघातांचं प्रमाण पुणे जिल्ह्यात १२२६ मृत्यू

 

राज्यात २०१६ मध्ये १३ हजार ६८२ जणांचा अपघाती मृत्यू

२०११ ते २०१६ या पाच वर्षात राज्यात  ७८ हजार ३१७ जणांचे अपघाती मृत्यू

रस्त्यावर होणाऱ्या या अपघाती मृत्यूमध्ये दुचाकीस्वार ट्रकखाली येऊन अपघात होण्याचं प्रमाण मोठं आहे. सोबतच अपघातानंतर तात्काळ म्हणजे गोल्डन अव्हरमध्ये उपचार मिळायची सोया उपलब्ध होत नसल्याने अपघाती मृत्यूचा आकडा हा धक्कदायक रित्या वाढलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...