S M L

...अन् लालबागच्या राजाचा 'दरबार' चक्क ओस पडला

लाखो भाविक तासंतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेतात. पण, काल चित्र वेगळं होतं.

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2017 03:40 PM IST

...अन् लालबागच्या राजाचा 'दरबार' चक्क ओस पडला

30  आॅगस्ट : नवसाला पावणारा राजा अशी ख्याती लाभलेल्या लालबागच्या राजाला गणेशोत्सवात तुफान गर्दी असते. लाखो भाविक तासंतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेतात. पण, काल चित्र वेगळं होतं. राजाचा दरबार गणेशभक्ताअभावी ओस पडला होता.

शान कुणाची लालबागच्या राजाची...असं म्हणत सेलिब्रिटी असो, राजकीय पक्षांचे प्रमुख असो, सगळेच गणेशभक्त गणेशोत्सवात राजाच्या दरबारात हजेरी लावतात. पण, मंगळवारी मुंबईतला 12 वर्षांत झालेला रेकाॅर्डब्रेक पावसामुळे राजाचा दरबार ओस पडला.

राजाचं दर्शन घेण्यासाठी आतूर असलेला गणेशभक्त पावसात पुरता अडकला. एवढंच नाहीतर परळ भागात पाणी साचल्यामुळे राजाच्या दरबाराकडे येणारे रस्तेही बंद झाले होते.  त्यामुळे राजाच्या दरबाराकडे गणेशभक्तांचा ओस पडला. नेहमी गर्दीने घेरला राजाचा दरबार मोजक्याचं गणेशभक्तांनी भरलेला होता.विशेष म्हणजे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन लवकर आणि सहज होतं नाही. पण गर्दी नसल्यामुळे हजर असलेल्या गणेशभक्तांनी अगदी आरामात दर्शन घेतलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 03:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close