S M L

कुलभूषण जाधव प्रकरणी मोदी सरकार पाकविरोधात कठोर भूमिका घेईल का ?

कुलभूषण जाधव यांचे प्राण वाचवण्यासाठी मोदी सरकारने पाकविरोधात आता ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 10:32 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी मोदी सरकार पाकविरोधात कठोर भूमिका घेईल का ?

11 एप्रिल : कुलभूषण जाधव यांच्यावर आज लोकसभेतही चर्चा झाली पाकनं जाधनवा फाशीची शिक्षा सुनावलीय. कोणत्याही परिस्थितीत जाधवना वाचवलं पाहिजे, यावर लोकसभेत एकमत झालं. काहीही करून आम्ही कुलभूषण जाधवना परत आणू, असं गृहमंत्र्यांनी दिलं तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला याच मुद्यावरून सज्जड दमही दिलाय.

कुलभूषण जाधव हा खरंतर भारताचा माजी नौदल अधिकारी...पण पाकिस्तानने याच कुलभूषण जाधवना कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलं कुठंतर म्हणे, बलुचिस्तानात म्हणजेच इराणमध्ये...एकूणच कायतर सगळाच कल्पोकल्पित प्रकार...पण तरीही पाकिस्तान कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय कुलभूषण जाधवना फाशीची शिक्षा ठोठाऊन मोकळं झालंय.

म्हणूनच पाकच्या या नापाक षडयंत्राविरुद्ध भारतीय संसदेत तीव्र पडसाद उमटलेत. कुलभूषणला निर्दोष सोडलं नाहीतर पाकिस्तानला द्विपक्षीय परिणामांना सामोरं जावं लागेल असा सज्जड दमच इशाराच सुषमा स्वराज यांनी भरलाय.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काहीही करून आम्ही जाधव यांना परत आणू असं आश्वासन दिलंय.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असल्याने केंद्र सरकारने थेट यूएनमध्ये दाद मागावी. अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांनी केलीय.

कसाब 26/11च्या हल्ल्यात अजमल कसाबला सर्वांसमोर पकडूनही भारताने त्याला लगेच काही फाशी दिली नाही. त्याच्याविरोधात रितसर खटला चालवला एवढंच नाहीतर त्याची बाजू मांडण्यासाठी वकीलही दिला होता मग इथंतर कुलभूषण जाधवविरोधात पाकिस्तानकडे कोणतेच ठोस पुरावे नाहीत. पण तरीही पाकिस्तान कुलभूषणला फाशीची शिक्षा सुनावण्याची इतकी घाई का करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणूनच पाकच्या या कृत्याविरोधात पाक उच्चायुक्ताविरोधात निदर्शनं करण्यात आली. म्हणूनच कुलभूषणचे प्राण वाचवण्यासाठी मोदी सरकारने पाकविरोधात आता ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 10:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close