S M L

अनोखं मंदिर : इथं दर्शन घेण्यासाठी महिलांसारखं नटतात पुरुष !

प्रत्येक देशातल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास बंदी आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. पण केरळच्या एका मंदिरात तर अनोखी प्रथा जोपासली जाते.

Renuka Dhaybar | Updated On: May 14, 2018 07:56 PM IST

अनोखं मंदिर : इथं दर्शन घेण्यासाठी महिलांसारखं नटतात पुरुष !

14 मे : प्रत्येक देशातल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास बंदी आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. पण केरळच्या एका मंदिरात तर अनोखी प्रथा जोपासली जाते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी महिलांसारख तयार होऊन प्रवेश करावा लागतो.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरातली ही प्रथा आहे. या मंदिरा दरवर्षी चाम्याविलक्कू हा सण साजरा केला जातो. या सणासाठी वेगवेगळ्या गावांमधुन पुरुष भक्त महिलांच्या वेषात देवीच्या दर्शनासाठी येत असतात.या पुरुषांना महिलांच्या वेषात तयार होण्यासाठी मंदिर परिसरात वेगळी मेकअप रुम तयार करण्यात आली आहे. या सणासाठी पुरुष फक्त महिलांसारखी साडीच नाही तर दागिने, संपूर्ण मेकअप, केसांना गजरा लावून सजतात आणि नटतात.

फक्त पुरुषच नाही तर तृतीयपंथी देखील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिला, तृतीयपंथी यांनी परवानगी आहे. पण पुरुषांना जर मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना महिला वेषातच जावं लागेल. त्यांना महिलांसारखं सोळा श्रृंगार करुन पुजा करावी लागते, अशी या मंदिराची अख्यायिका आहे.

Loading...
Loading...

गावकरी मंडळींच्या सांगण्यानुसार, या मंदिरातली देवीची मुर्ती ही स्वत: प्रकट झाली आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे असं एकमेव मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्याला छत नाही आहे किंवा कोणताही कलश नाही आहे. या अनोख्या प्रथेमुळे या गावाची चर्चा सर्वदूर पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close