एका'टाचणीमॅन'ची रहस्यमयी कहाणी,अंगात इतक्या टाचण्या आल्या कुठून ?

एका'टाचणीमॅन'ची रहस्यमयी कहाणी,अंगात इतक्या टाचण्या आल्या कुठून ?

बद्रीलाल मीना यांच्या शरिरात तब्बल 75 ते 80 टाचण्या आहेत. या टाचण्या त्यांच्या शरिरात गेल्या कशा हे मात्र एक गुढ रहस्यच आहे.

  • Share this:

मोहम्मद तारीक, मुंबई

02 मे: शरीराला एक टाचणी टोचली तरी वेदना होतात...मात्र रेल्वेचे कर्मचारी बद्रीलाल मीना यांच्या शरिरात तब्बल 75 ते 80 टाचण्या आहेत. या टाचण्या त्यांच्या शरिरात गेल्या कशा हे मात्र एक गुढ रहस्यच आहे. त्यांच्यावर मुंबईच्या रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्या आसपास काहीतरी विचित्र घटना घडत असतात आणि त्याचा संदर्भही लागत नाही. अशीच एक विचित्र गोष्ट समोर आलीय. रेल्वेचा कर्मचारी असलेल्या बद्रीनाथ मीना यांच्या शरीरात तब्बल 75 ते 80 टाचण्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात टाचण्यात शरीरात कशा हाही प्रश्न आहे. कारण बद्रीनाथ यांच्या शरीरावर एकही व्रण नाहीय.

बद्रीलालच्या शरीरातील टाचण्याचं एक रहस्यच आहे. या शरीरात कुठुन आल्या हे त्यांनाही माहित नाहीय.. आता तर त्यांच्या शरीरावर मागच्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी जखमा यायला सुरुवात झालीये. मधुमेहाचा त्रास आहे की काम म्हणून ब्रद्रीलाल एका रुग्णालयात गेले. मात्र तिथे त्यांचं शरीर टाचण्यांची भरल्याचं निदान झाल्यावर त्यांना धक्काच बसला.

जगजीवन राम रुग्णालयाच्या डॉक्टर्सकडूनही या रहस्याबाबत काही सांगितलं जात नाहीये. साहजिकच बद्रीलाल यांच्या शरीरातील टाचण्या हे एक रहस्यच आहे.  पण लवकरच डॉक्टर याबाबत काही वैज्ञानिक कारणं सांगतील आणि बद्रिलाल बरे होऊन घरी परततील ही आशा करूया..

First published: May 2, 2017, 11:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading