एक फोन करा, झाडं घेऊन पठ्या तुमच्या दाराच हजर; कोल्हापुरच्या प्रतीकचा नादखुळा

एक फोन करा, झाडं घेऊन पठ्या तुमच्या दाराच हजर; कोल्हापुरच्या प्रतीकचा नादखुळा

कोल्हापूर हिरवगार करण्याचा विडाच या पट्ट्यानं उचललाय. एक रिंग मारायचा अवकाश.. कुदळ, फावडं आणि झाड घेऊन प्रतीकभाऊ दारात हजर..

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

17 मे : निसर्गाला वाचवण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती आजही झटताहेत. कारण याच निसर्गानं आपल्याला भरभरुन दिलंय. ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे याच निसर्गासाठी पर्यायानं झाडांसाठी कोल्हापूरमधला एक तरुण झटतोय.

डोंगर फोडून गावासाठी रस्ता करणारा मांझी तुम्ही पाहिला असेल किंवा ओसाड झालेल्या हजार एकर जमिनीचं रुपांतर घनदाट जंगलात करणाऱ्या आसाममधल्या मोलाई पायेंगची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. पण भावांनो, आपल्या कोल्हापुरातही असाच एक अवलिया राहतो बरं का..ज्याचं नाव आहे प्रतीक बावडेकर..कोल्हापूर हिरवगार करण्याचा विडाच या पट्ट्यानं उचललाय. एक रिंग मारायचा अवकाश.. कुदळ, फावडं आणि झाड घेऊन प्रतीकभाऊ दारात हजर..

वर्षभरात प्रतीकनं कोल्हापुरात २१२ झालं लावली आहेत आणि यासाठी तो घरमालकाकडून एकही पैसा घेत नाही. झाड आणणं..खड्डा खणणं आणि झाड लावणं ही सगळी कामं एकटा प्रतीकभाऊच करतो. सावलीसाठी आणि पक्ष्यांसाठी उपयोगी ठरणारी देशी झाडं लावण्यावर त्याचा भर आहे.

प्रतीकचा बोलबाला शहरभर झालाय. आता कोल्हापूरकर हक्कानं त्याला फोन करतात आणि प्रतीकही कधीच त्यांना नकार देत नाही.

उन्हानं घामटा निघतोय...आपण पंखा लावतो, एसी बसवतो..पण हक्काची सावली देणारं एक झाड लावायचा विचार आपल्या मनात येत नाही म्हणूनच प्रतीकभावाचं काम लय भारी आहे.

First published: May 17, 2017, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading