कोल्हापुरकरांचा नादखुळाच, 'इथं' पाळला जातोय चक्क 'मोबाईल उपवास' !

विद्यार्थ्यांनाही मोबाईलचे एक प्रकारे व्यसनच लागलं पण हेच व्यसन दूर करण्यासाठी कोल्हापूर शहरातल्या सायबर महाविद्यालयातील विद्यार्थी आता पुढे सरसावले आहेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2018 11:33 PM IST

कोल्हापुरकरांचा नादखुळाच, 'इथं' पाळला जातोय चक्क 'मोबाईल उपवास' !

संदीप राजगोळकर,कोल्हापूर

30 एप्रिल : सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतो. ग्रामीण भागांमध्येही स्मार्ट फोनचे प्रमाण वाढलेला आहे आणि मोबाईल ही काळाची गरज बनलीय पण कोल्हापूरमधल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल उपवास करायचा ठरवले आहे, ऐकून नवल वाटलं ना पण हे खरं आहे.

कॉलेजचा कॅम्पस असो की बाजारपेठ, गावातली गल्ली असो की अपार्टमेंट मधली वस्ती, बस रेल्वेतील प्रवासी असो वा सार्वजनिक ठिकाणची गर्दी...प्रत्येक जणाच्या कानाला मोबाईल असतो, नाहीतर हातात मोबाईल वरून काहीतरी काम चालू असतं सुरुवातीला सगळ्यांच्यात हातामध्ये साधे हँडसेट पाहायला मिळायचे पण आताचे युग बदललं. स्मार्टफोन आले त्यातच 3 जी, 4 जी ची टेक्नोलॉजी आली मग काय मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनला पण याचा सर्वात मोठा फटका बसला तो विद्यार्थ्यांना...

विद्यार्थ्यांनाही मोबाईलचे एक प्रकारे व्यसनच लागलं पण हेच व्यसन दूर करण्यासाठी कोल्हापूर शहरातल्या सायबर महाविद्यालयातील विद्यार्थी आता पुढे सरसावले आहेत. या महाविद्यालयात मोबाईल उपवास पाळला जातोय. दर महिन्याला हा मोबाईल उपवास असून प्रत्येक विद्यार्थी दिवसभरातील किमान पाच ते सहा तास मोबाईल पासून दूर राहतो आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. एकमेकांमधला संवादही वाढला आहे.

सुरुवातीला विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर करण हे खरतर शिक्षकांसमोर एक आव्हान होतं. पण सायबर महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक भोसले यांनी हे आव्हान पेलून त्यांनी विद्यार्थ्यांना याबाबतची जबाबदारी समजून सांगितली आणि जनजागृतीही केली मग विद्यार्थीही त्याला तयार झाले आणि हा उपक्रम सुरू झाला.

Loading...

आता एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यात येणार आहे तसंच त्याची व्याप्तीही वाढविण्यात येणार आहे आणि हा मोबाईल उपवास हळूहळू समाजापर्यंत जर पोहोचला तर नक्कीच समाजालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. कमी होत चाललेला संवाद, कमी होत चाललेलं बोलणं पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे मोबाइल उपवासाचा उपक्रम स्तुत्य आहे हे मात्र नक्की...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...