S M L

आईने दिली मुलासोबत दहावीची परीक्षा, निकाल...

पण ज्यावेळी त्याला समजल की त्याची आई सोबतच परीक्षेला बसणार आहे. मग काय त्यानंही आईला अभ्यासात मोठी मदत केली

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2018 11:42 PM IST

आईने दिली मुलासोबत दहावीची परीक्षा, निकाल...

कोल्हापूर, 09 जून : शिक्षण ही अनंत काळ चालणारी गोष्ट आहे असं म्हटलं जातं आणि कोल्हापूरच्या एका रणरागिणीने हे साध्यही करून दाखवलंय. आपल्या मुलासोबत तिने दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवलं. कोल्हापूरच्या मनीषा नलवडे यांच्या परीक्षेचा हा प्रवास..

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील गणेशवाडीमधलं हे नलवडे कुटुंबीय..आज त्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा केला जातोय. प्रत्येकजण एकमेकाला साखर भरवताना दिसतायेत त्याचं कारणही तसंच आहे. आईने दहावीची बोर्डाची परीक्षा दिली तीही आपल्या मुलासोबत आणि ही दोन्ही माय-लेक दहावीच्या परीक्षेत पास झाली आहेत.

मुलाला पडलेत 84 टक्के गुण आणि आईला पडलेत 52 टक्के गुण...विशेष म्हणजे  मनीषा नलवडे यांचा मोठा मुलगा महेश हाही यंदाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालाय. त्यामुळं वर्षभर नलवडे यांच्या घरामध्ये अभ्यासाच वातावरण होतं. घरकाम सांभाळत आणि आशा वर्कर्सचं काम सांभाळत मनिषाताईनी दहावीची परीक्षा दिली.

मनीषा ताईंचा मुलगा आदित्यनही  यंदा दहावीची परीक्षा दिली. पण ज्यावेळी त्याला समजल की त्याची आई सोबतच परीक्षेला बसणार आहे. मग काय त्यानंही आईला अभ्यासात मोठी मदत केली त्याचा मोठा भाऊ महेश आणि आदित्य या दोघांनी आपल्या आईची अभ्यासाबाबत योग्य काळजी घेतली आणि ज्यावेळी निकाल समजला त्यावेळी त्यांच्या घरात आनंदाला पारावर उरला नाही.

Loading...

आजही अनेक महिला शिक्षणाच्या बाबतीत मागे असल्याचे चित्र दिसते पण तब्बल वीस वर्षांनंतर का होईना मनीषा नलवडे यांनी ही परीक्षा देऊन महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत हेच दाखवून दिलंय.

दहावीच्या परीक्षेनंतरही मनीषा यांना अजून पुढे शिकायचे आहे. त्यांचे पती गवंडी काम करतात. घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे, पण दोन्ही मुलांचं यश आपल्या डोळ्यात साठवून त्यांनी ही स्वतःच्या कर्तृत्वावर दहावीच्या परीक्षेचं हे यश मिळवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 11:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close