गेल्या दीड वर्षापासून महिला पोलीस अधिकारी बेपत्ता

गेल्या दीड वर्षापासून महिला पोलीस अधिकारी बेपत्ता

पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

17 नोव्हेंबर : एखादी व्यक्ती जर बेपत्ता झाली तर त्याचा पोलीस कसून शोध घेतात. पण बेपत्ता झालेली व्यक्ती जर पोलीसच असेल तर....वेगळं वाटलं ना ऐकून..पण होय, कोल्हापूर जिल्ह्यातली एक महिला पोलीस अधिकारी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे..मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं आळते गावं..एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. होय..,त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी...तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.

विशेष म्हणजे अश्वीनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली गेली. त्यानंतरही तपास लागत नाही म्हटल्यावर अश्विनीच्या भावानं आणि वडिलांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आजही अश्विनीचे वडील हे तिची वाट पाहताहेत. मात्र तिचा घातपात झाला की ती सुरक्षीत आहे याचं उत्तर मात्र अजूनही मिळाललं नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे अश्विनीबाबत तिच्या घरच्यांनी ज्या अधिकाऱ्यावर संशय व्यक्त केलाय त्याला पोलीस दलातले अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आजही तिची 10 वर्षांची मुलगी तिची वाट पाहतेय. तरीही वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही गोरे आणि बिद्रे कुटुंबियांना त्याची काहीच माहिती पोलीस दलाकडून देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 05:27 PM IST

ताज्या बातम्या