• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • कोल्हापूरकरांचा नादखुळा ; 100 मिटर गाडी ढकला, 15 लिटर पेट्रोल जिंका !

कोल्हापूरकरांचा नादखुळा ; 100 मिटर गाडी ढकला, 15 लिटर पेट्रोल जिंका !

कोल्हापूरकर म्हणजे नाद खुळा असतंय...एकदम काटा कीर्रच...आज गाडीला धक्का दिलंय म्हनून हसू नका..

  • Share this:
संदीप राजगोळकर,इचलकरंजी 29 मे : जगात भारी अशी ओळख असलेले शहर म्हणजे कोल्हापूर आणि याच कोल्हापूरमध्ये एक आगळीवेगळी स्पर्धा नुकतीच पार पडली ही स्पर्धा होती...पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधातली, काय होती ही स्पर्धा...? मंडळी ही पोरं बगा जीवाच्या आकांतानं कशी घाम गाळत्यात...गाडीत डिजेल न्हाय मनून न्हाय काय...पेट्रोल जिंकण्यासाठी मनून ह्यांचा असा हुसेन बोल्ट झालाय...आता पेट्रोल आन डिजेल एवढं म्हाग झालंय की इचारूच नका... मनूनच ह्या भावानं थेट ढकल गाडीचीच शर्यत ठेवली की राव...100 मिटरात जो कमीत कमी येळेत पोचंल तोच जिंकलं. कोल्हापूरचे हे हुसेन बोल्ट काय उगच पळत न्हाईत...बक्षीस हाय बक्षीस... सादं सुदं न्हाय काय...15 लिटर पेट्रोल हाय पईला आल्यास...दुसऱ्याला 10 आन तिसऱ्याला 5 लिटर... आता येवड्या महागाचं येवडं पेट्रोल मनल्यास घाम तर गाळावाच लागनार न्हाय का? अरारारा...या पठ्ठ्यानं लई घाम गाळलाय की... कोल्हापूरकर म्हणजे नाद खुळा असतंय...एकदम काटा कीर्रच...आज गाडीला धक्का दिलंय म्हनून हसू नका...पेट्रोल डिझेल कमी झालं न्हाय तर कदी सरकारला धक्का दील ते कळायचंबी न्हाय...कळलं का?
First published: