S M L

कोल्हापूर मिनीबस अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ड्रायव्हरला लागलेल्या डुलकीमुळे बस कठडा तोडून पुलाखाली कोसळली अशी शक्यता आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2018 08:37 PM IST

कोल्हापूर मिनीबस अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

27 जानेवारी : कोल्हापूरच्या मिनीबस अपघाताचे सीसीटीव्ही न्यूज18 लोकमतच्या हाती लागलेत. कोल्हापूरच्या शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनीबस खाली कोसळली.ड्रायव्हरला लागलेल्या डुलकीमुळे बस कठडा तोडून पुलाखाली कोसळली अशी शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये मिनी ट्रॅव्हल बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत.  काल मध्यरात्री बाराच्या दरम्यान हा अपघात झाला असून गाडीतील सर्व प्रवासी हे पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पिरंगुट आणि बालेवाडी इथली 3 कुटुंबं देवदर्शनासाठी गणपतीपुळ्याला गेली होती. दर्शन आटोपल्यानंतर पुण्याला परतत असताना कोल्हापूरजवळच असलेल्या शिवाजी पुलावर ही मिनी बस जोरदार कठड्याला धडकली आणि त्यानंतर थेट पंचगंगा नदीत कोसळली. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2018 08:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close