'या' अँग्री कोंबड्याचा नादखुळा, मालकाने पाटीच लावली 'कोंबड्यापासून सावधान' !

'या' अँग्री कोंबड्याचा नादखुळा, मालकाने पाटीच लावली 'कोंबड्यापासून सावधान' !

ज्यांच्या घरी कुत्रा असतो त्यांच्या घराबाहेर कुत्र्यापासून सावधान अशी पाटी पाहयाला मिळते. पण कोल्हापुरातल्या एका घराबाहेर चक्क कोंबड्यापासून सावधान अशी पाटी लिहिलीये.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

18 जुलै : ज्यांच्या घरी कुत्रा असतो त्यांच्या घराबाहेर कुत्र्यापासून सावधान अशी पाटी पाहयाला मिळते. पण कोल्हापुरातल्या एका घराबाहेर चक्क कोंबड्यापासून सावधान अशी पाटी लिहिलीये.

"कोंबड्यापासून सावधान" घरासमोरची ही पाटी पाहा...चक्क कोंबड्यापासून सावधान असं या पाटीवर लिहिलंय.  एरव्ही कुत्र्यापासून सावधान अशी पाटी पाहायची सवय आपल्याला आहे. पण कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातल्या मराठा कॉलनीत राहणाऱ्या सतीश पाटील यांच्याकडे हा कोंबडा आहे. हा कोंबडाच घराचा सुरक्षारक्षक झालाय. नुसतं दारात जर कुणी अनोळखी व्यक्ती आली तर हा कोंबडा त्यांच्यामागे लागतो.

त्यामुळे चक्क या कोंबड्याच्या मालकानं आपल्या घरासमोर कोंबड्यापासून सावध रहावे अशी पाटीच लावलीय.

धोकादायक वाटणाऱ्या या कोंबड्याची बावडा परिसरात मात्र चांगलीच चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 10:07 PM IST

ताज्या बातम्या