स्वयंपाकगृह की कचराकुंडी?, मुंबईतील शासकीय वसतीगृहातील किळसवाणे दृश्य !

. ही दृश्य पाहून तुम्हाला किळस येईल. पण इथल्या विद्यार्थ्यांना हे असं निकृष्ट दर्जाचं अन्न खावं लागतं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2018 08:49 PM IST

स्वयंपाकगृह की कचराकुंडी?, मुंबईतील शासकीय वसतीगृहातील किळसवाणे दृश्य !

प्राजक्ता पोळ, मुंबई

30 एप्रिल : शिकून मोठं होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यभरातले विद्यार्थी मुंबई गाठतात.. अशा विद्यार्थ्यांसाठी आसरा असतो तो सरकारी वसतीगृहाचा.. मुंबईतलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशाच एका वसतीगृहांपैकी एक... मात्र या वसतीगृहात कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, याचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट....

हा फोटो पाहिल्यानंतर याला स्वयंपाकगृह म्हणायचं की कचराकुंडी? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...

उष्ट्या अन्नानं बरबटलेलं ताट म्हणजे उंदरांसाठी आयती मेजवानीच... धुणी-न्हाणी करायाच्या ठिकाणीच जिन्नसाची गोणी....एकाच कढईत सगळे पदार्थ तळल्यामुळं काळकुट्ट झालेलं तेल...

आमटीचं हे पातेलं पाहिल्यानंतर भूक देखील मरून जाईल यात शंका नाही...

Loading...

माश्या देखील या सडलेल्या कोथिंबीराच्या जुडीवर बसण्याआधी दहा वेळा विचार करतील...

अशा घाणेरड्या कठड्यावर या भाज्यांची देखील नक्कीच घुसमट होत असणार...

या कुजलेल्या सफरचंदाचा नुसता फोटो पाहुन देखील तुम्ही नाकावर रूमाल धराल...

जगात कुणी अस्वच्छतेची स्पर्धा भरवली, तर या स्वयंपाक घराचा पहिला क्रमांक निश्चित येणार...

किळसवाणा...हा शब्द देखील अपुरा पडावा अश्या भावनेला जन्म घालणारी ही दृश्य आहेत, मुंबईतल्या वरळीमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाच्या स्वयंपाक गृहाची..

डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामधल्या मेसमधली ही दृश्य आहेत. ही दृश्य पाहून तुम्हाला किळस येईल. पण इथल्या विद्यार्थ्यांना हे असं निकृष्ट दर्जाचं अन्न खावं लागतं. खराब झालेली फळं, कुजलेल्या भाज्या त्यात उंदीर आणि झुरळांचं साम्राज्य अश्या ठिकाणी शिजवेलं हे अन्न खावं लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय.

विद्यार्थ्यांची तक्रार ऐकल्यानंतर न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा आंबेडकर वसतीगृहाच्या स्वयंपाकगृहात शिरला..विद्यार्थ्यांनी जे सांगितलं होतं, तेच कॅमेऱ्यानं टिपलं..

समाजाच्या कल्याणासाठी नियुक्त केलेले.. म्हणजेच समाज कल्याण विभागाच्या सहआयुक्तांना आम्ही यासंदर्भात विचारणा केली.

कॅमेऱ्यात सर्व काही कैद झाल्यानं त्यांना चूक मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

बातमीनंतर प्रशासन स्वयंपाकी कंत्राटदाराला बदलेले, त्याला काळ्या यादीत टाकेल. मात्र तेवढ्यानं प्रश्न सुटणार नाहीये.

गरज आहे ती , सरकार दरबारी सगळं काही खपतं ही मानसिकता बदलण्याची..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...