• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • मुख्यमंत्रीसाहेब, मारुती कांबळेचं काय झालं ? - खडसेंची आर्त हाक

मुख्यमंत्रीसाहेब, मारुती कांबळेचं काय झालं ? - खडसेंची आर्त हाक

हतबल झालेल्या खडसेंनी सामना चित्रपटातल्या 'मारुती कांबळेचं झालं ?' हा प्रश्न जसा अनुत्तरित राहिला तसाच माझ्या जागेचं झालं का? अशी आर्त हाक खडसेंनी सभागृहातच दिली. या प्रश्नावर मुख्यमंत्रीही तेवढेच शांत उत्तर दिलं. "ही बाब तपासून पाहू"

  • Share this:
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रच्या राजकारणात गेली वर्षभर अनोखा "सामना" रंगलाय. एकेकाळी गुरुशिष्य असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आणि भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे आमने सामने आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा सांगणारे खडसे मंत्रिमंडळातून खड्या सारखे बाजूला केले गेले. भोसरी एमआयडीसीची जागा डीनोटिफाईड केल्याप्रकरणी खंडसेंचं मंत्रिपद गेलं. एक वर्ष झालं खडसे मंत्रिमंडळात परत येण्यासाठी धडपड करताय. पण अजूनही मुख्यमंत्री खडसेंना दाद देत नाहीत. म्हणूनच हतबल झालेल्या खडसेंनी काल अधिवेनाच्या समारोप भाषणात मुख्यमंत्र्यांना थेट सामना चित्रपट स्टाईलने सभागृहातच प्रश्न विचारला, 'मारुती कांबळेचं काय झालं?' महसूल आणि लॅंड रेकॉर्डच्या अभ्यासात हुशार असलेल्या खडसेंनाच जमिनीच्या घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला. थोडक्यात, पट्टीचा पोहणाऱ्याचा पाण्यात बुडून अंत व्हावा, इतकी वाईट परिस्थिती सध्या खडसेंची झालीय. या जागेचं हस्तांतरण डिनोटिफाईड नियमानुसार झालंय असं खडसे वारंवार सांगताहेत. यासाठी खडसेंनी सरकारविरोधात चक्क महितीअधिकाराचंही अस्त्र चालवलं पण ते निष्फळ ठरलं. म्हणून मग, खडसेंनी थेट विधानसभेतच राज्यातील एमआयडीसीच्या 31 हजार एकर जागेचा घोटाळा बाहेर काढला. सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलं असतानाच खडसेंनी एमआयडीसी जागेचा मुद्दा वारंवार विविध मार्गाने विधानसभेत उपस्थित केला. पण सरकारने कुठलीही दाद लागू दिली नाही. म्हणूनच मग हतबल झालेल्या खडसेंनी सामना चित्रपटातल्या 'मारुती कांबळेचं झालं ?' हा प्रश्न जसा अनुत्तरित राहिला तसाच माझ्या जागेचं झालं का? अशी आर्त हाक खडसेंनी सभागृहातच दिली. अखेर खडसेंचा संयमाचा बांध सुटला, थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून खडसेंनी हा भावनिक शाब्दिक हल्ला चढवला. "मायबाप सरकार तुम्ही 31 हजार एकर जागेच डी नोटिफिकेशन करतात, मग, माझी 3 एकर जागा का सोडली. तुम्ही आता घेतलेली 31 हजार एकर जागा अनेकांना परत केली, तो भ्रष्टाचार होत नाही. मग मी 50 वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेली जागा परत दिली असेन तर त्यात दोषी कसा ? अशा कातर आवाजातल्या खडसेंच्या या प्रश्नावर मुख्यमंत्रीही तेवढेच शांत उत्तर दिलं. "ही बाब तपासून पाहू" "सामना" चित्रपटात मारुती कंबळेचं काय झालं, या प्रश्नाचं जसं 40 वर्षानंतरही अनुत्तरित आहे. तसंच काहिसं चित्रं खडसे-मुख्यमंत्री वादाच्या निमित्ताने पुन्हा सभागृहात बघायला मिळालं, पण इथं फरक फक्त एवढाचं आहे की विधानसभा सभागृहातल्या या मुख्यमंत्री-खडसे यांच्यात रंगलेल्या "सामना" उत्तर मात्र मिळालंय. आणि ते म्हणजे खडसेंचं मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक नाही !
First published: