दररोज 350 किमी प्रवास करतात कर्नाटकचे 'हे' मंत्रीमहोदय,कारण...

जर रेवन्ना बंगळुरूमध्ये थांबले तर सरकार पडले असं भाकित या ज्योतिषाने सांगितलं. मग काय रेवन्नांनी ही गोष्ट इतकी मनावर घेतली की

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2018 05:33 PM IST

दररोज 350 किमी प्रवास करतात कर्नाटकचे 'हे' मंत्रीमहोदय,कारण...

कर्नाटक, 05 जुलै : सत्ता जाण्याची भीती काय असते हे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एचडी रेवन्ना सांगू शकतात. म्हणूनच सत्ता हातातून जाऊ नये या धाकाने हे मंत्रिमहोदय दररोज 340 किलोमिटरचा प्रवास करतात. कर्नाटकच्या सर्व आमदारांना रेवन्ना हे नशिबाला किती मानतात हे चांगलंच ठाऊक आहे. अगदी छोट्यातील छोट्या घटनेसाठी रेवन्ना ज्योतिष्याचा सल्ला घेत असतात. त्यांच्या या भीतीपोटीच कॅबिनेट मंत्री असून सुद्धा रवन्ना दररोज सहा ते सात तास प्रवासावर खर्च करतात.

एचडी रेवन्ना हे रोज संध्याकाळी बंगळुरूहुन आपल्या घरी होलेनेरासिपुरा येथून निघतात. जे की 170 किलोमिटर दूर आहे. हे अंतर पार करण्यासाठी त्यांना तीन तास लागतात. सकाळी सुद्धा त्यांना बंगळुरूमध्ये परत येण्यासाठी त्यांना एवढाच वेळ लागतोय. अशा प्रकार कर्नाटकाचे एक वरिष्ठ मंत्री प्रवासात सहा ते सात तास खर्च करतात.

 हेही वाचा - हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जेडीएसच्या सुत्रांनी न्यूज18 दिलेल्या माहितीनुसार, एका ज्योतिषाने रेवन्ना यांना बंगळुरूमध्ये न थांबण्याचा सल्ला दिला. जर रेवन्ना बंगळुरूमध्ये थांबले तर सरकार पडले असं भाकित या ज्योतिषाने सांगितलं. मग काय रेवन्नांनी ही गोष्ट इतकी मनावर घेतली की ते रात्री घरी म्हणजेच बंगळुरात न थांबण्याचा निर्णय घेऊन टाकला.

 हेही वाचा -कुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी; पेट्रोल मात्र महागले

Loading...

याआधी 6 जून रोजी एचडी रेवन्ना यांनी 2.12 मिनिटात शपथ घेतली होती. विधानसभेचे वरिष्ठ आमदार आरवी देशपांडे यांनी त्यांच्याआधी शपथ घ्यायची होती पण त्यांनी नियम तोडून आधी शपथ घेतली. 2006 मध्ये जेव्हा कुमारस्वामी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी रेवन्नांनीच त्यांचे निवासस्थान सजावले होते. परंतु, कुमारस्वामी यांचे सरकार जास्त दिवस टिकू शकले नाही.

मंत्री एचडी रेवन्ना हे किती धार्मिक आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले. जेव्हा हस्सन जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान ते एका पुजाऱ्यावर प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी ओरडून 'या पुजाऱ्याला इथं कुणी आणलं ?, याला काहीही येत नाही', असं भरकार्यक्रमात ओरडले होते. पण त्यानंतर त्यांनी प्रशासनाला आदेश देऊन या पुजाऱ्याची राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.

 हेही वाचा - JioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे

आश्चर्याची बाब म्हणजे माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचं कुटुंब हे धार्मिक प्रथा, ज्योतिष्य आणि वास्तूदोषावर विश्वास ठेवत नव्हते.

बुधवारी विधानसभा सत्रादरम्यान रेवन्नांनी आपली जागा बदलली होती. पण भाजप नेते आणि माजी मंत्री इस्वरप्पा यांनी यावरून त्यांची खिल्ली उडवली त्यानंतर रेवन्ना पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले.

कर्नाटकमध्ये सिद्धारमैया सरकारने जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केले होते. विधानसभेत वादळी चर्चेनंतर या विधेयकाला मंजूर करण्यात आलं होतं. रेवन्ना यांच्या सारख्या नेत्यामुळे या विधेयकाला मंजूर होण्यास उशीर झाला होता. विशेष म्हणजे याविधेयकामध्ये ज्योतिष्य आणि वास्तूवर बंदी घातली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...