कांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री

  • Share this:

9 ऑक्टोबर 2006 मध्ये बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. कांशीराम यांनी आपल्या कतृत्वानं राजकारणात एक वेगळी छाप टाकली आणि देशातला तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कांशीराम यांचं प्रेरणास्थान. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसुत्रीचा आधार घेत त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली. ''राजकीय सत्ता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे'' हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी आत्मसात केला होता. त्याच्या प्रत्येक सभेत ते हे वाक्य वारंवार सांगत असतं. त्यामुळच मायावती या आपलं सर्व शिक्षण आणि IAS चं स्वप्न सोडून राजकारणात आल्या. कांशीराम यांनी स्थपन केलेल्या बामसेफच्या (BAMCEF) माध्यमातून ठरवलेलं उद्दीष्ट पूर्ण करणं शक्य नव्हतं. मायावतींनी बामसेफचा उत्तरप्रदेशात विस्तार करण्याचं मोठं काम केलं. कांशीराम हे पंजाबचे होते तरीही मायावतींमुळे त्यांचा जम उत्तर प्रदेशात बसला.

या सगळ्या घडामोडी सुरू होत्या तेव्हा 1980चं दशक संपत आलं होतं. आणीबाणी नुकतीच संपली होती. जनता पार्टीतल्या भांडणामुळं लोकांना पुन्हा एकदा काँग्रेस हाच पर्याय वाटत होता. 1980 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून लोकांनी ते दाखवूनही दिलं. पण आता लोक पर्यायांचा विचार करू लागले. दक्षिण भारतात अनेक प्रादेशिक पक्ष पुढं येत होते. त्यांचं अस्मितेचं राजकारण सुरू होतं. ही अस्मितेची लाट उत्तरेतही आली होती. संजय गांधींच्या मृत्यूने काँग्रेसला धक्का बसला होता. तरूण नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. अशा वातावरणात मायावती या कांशीराम यांच्यासाठी हुकूमाचा एक्का ठरल्या. जातीय आणि अस्मितांच्या राजकारणात काँग्रेसचं अपयश हे नव्या पक्षांसाठी संजीवनी ठरलं.

त्या काळात काँग्रेसचा दलित चेहेरा होते बाबू जगजीवनराम. पण जगजीवनरामच काँग्रेसची साथ सोडून जनता पार्टीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी ज्या 'रिपब्लिकन पार्टी' ची स्थापना केली तो पक्षही गटातटात विभागला गेला. सामाजिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी 'रिपब्लिकन पार्टी'ने राजकारणावरच सगळा भर दिला. सत्तेची चव चाखल्या नंतर जे व्हायचं तेच झाल. नेतृत्वाचा संघर्ष, अहंकारामुळं हा पक्ष खिळखिळा होत गेला. त्याचा जनाधार आटत गेला. 'दलित पॅथर्स' सारख्या आक्रमक संघटनांचा प्रभाव फारसा टिकू शकला नाही. त्यामुळं कांशीराम यांना दलित राजकारणातली पोकळी भरून काढण्याची मोठी संधी मिळाली.

या सगळ्या वातावरणात दलितांसाठीच्या पक्षाला मोठी संधी होती. 1980 मध्ये मंडल आयोगाने दलितांसाठी 27 टक्क्यांच्या आरक्षणाला मान्यता दिली होती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या 22.5 टक्के आरक्षणापेक्षा हे आरक्षण वेगळं होतं. सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळाल्याने अनेक जाती-जमातींमध्ये नवी प्रेरणा मिळाली. लोकांमध्ये नवी जागृती झाली. कांशीराम यांच्यासाठी हे वातावरण अत्यंत पोषक होतं. उत्तर भारतात असलेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना ही संधी होती आणि मायावतींसारखी सेनापतीही त्यांना मिळाली होती.

कांशीराम यांना आंदोलनातला प्रदीर्घ अनुभव होता आणि राजकारणाचीही उत्तम जाण होती. त्यामुळं बामसेफ सोडण्याच्या आधी 1980 मध्ये एप्रिल ते जून महिन्यात त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली. तो कार्यक्रम होता "अंबेडकर ऑन व्हील्स" या कार्यक्रमांतर्गत डॉ.आंबेडकरांचे विचार आणि शिकवण देणारं प्रदर्शन त्यांनी तयार केलं होतं आणि सर्व देशभर ते प्रदर्शन नेवून लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहिमच त्यांनी हाती घेतली. त्यामुळं दलित समाजात नवी जागृती निर्माण झाली. हे करत असताना त्यांनी त्यात कुठेही राजकारण आणलं नाही की लोकांना मतं मागितली नाहीत. त्यामुळं लोकांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला.

हे प्रदर्शन उत्तरेतल्या 9 राज्यामध्ये 34 ठिकाणांवर दाखवलं गेलं. या मोहिमेमुळं कांशीराम यांना अनेक नवे कार्यकर्ते मिळाले. संघटनेच्या विस्तारासाठी वातावरण निर्माण झालं. लोक वर्गणी देऊ लागले. कांशीराम ज्या आंदोलनाचं स्वप्न पाहू लागले तसं वातावरण निर्माण होऊ लागलं. याच उपक्रमामुळं लोक मायावतींना ओळखू लागले आणि मायावतींनीही आपल्या भाषणांनी आणि कामाने संघटन कौशल्य सिद्ध केलं. त्यामुळं कांशीराम यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मायावतींना कधीही कुणाकडे पैसे मागावे लगाले नाही. कार्यकर्त्यांनी दिलेल्या देणगीतूनच त्यांचा कारभार चालत असे.

हे प्रदर्शन उत्तरेतल्या 9 राज्यामध्ये 34 ठिकाणांवर दाखवलं गेलं. या मोहिमेमुळं कांशीराम यांना अनेक नवे कार्यकर्ते मिळाले. संघटनेच्या विस्तारासाठी वातावरण निर्माण झालं. लोक वर्गणी देऊ लागले. कांशीराम ज्या आंदोलनाचं स्वप्न पाहू लागले तसं वातावरण निर्माण होऊ लागलं. याच उपक्रमामुळं लोक मायावतींना ओळखू लागले आणि मायावतींनीही आपल्या भाषणांनी आणि कामाने संघटन कौशल्य सिद्ध केलं. त्यामुळं कांशीराम यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मायावतींना कधीही कुणाकडे पैसे मागावे लगाले नाही. कार्यकर्त्यांनी दिलेल्या देणगीतूनच त्यांचा कारभार चालत असे.

9 ऑक्टोबर 2006 मध्ये बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. कांशीराम यांनी आपल्या कतृत्वानं राजकारणात एक वेगळी छाप टाकली आणि देशातला तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कांशीराम यांचं प्रेरणास्थान. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसुत्रीचा आधार घेत त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली. ''राजकीय सत्ता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे'' हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी आत्मसात केला होता. त्याच्या प्रत्येक सभेत ते हे वाक्य वारंवार सांगत असतं. त्यामुळच मायावती या आपलं सर्व शिक्षण आणि IAS चं स्वप्न सोडून राजकारणात आल्या. कांशीराम यांनी स्थपन केलेल्या बामसेफच्या (BAMCEF) माध्यमातून ठरवलेलं उद्दीष्ट पूर्ण करणं शक्य नव्हतं. मायावतींनी बामसेफचा उत्तरप्रदेशात विस्तार करण्याचं मोठं काम केलं. कांशीराम हे पंजाबचे होते तरीही मायावतींमुळे त्यांचा जम उत्तर प्रदेशात बसला.

9 ऑक्टोबर 2006 मध्ये बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. कांशीराम यांनी आपल्या कतृत्वानं राजकारणात एक वेगळी छाप टाकली आणि देशातला तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कांशीराम यांचं प्रेरणास्थान. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसुत्रीचा आधार घेत त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली. ''राजकीय सत्ता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे'' हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी आत्मसात केला होता. त्याच्या प्रत्येक सभेत ते हे वाक्य वारंवार सांगत असतं. त्यामुळच मायावती या आपलं सर्व शिक्षण आणि IAS चं स्वप्न सोडून राजकारणात आल्या. कांशीराम यांनी स्थपन केलेल्या बामसेफच्या (BAMCEF) माध्यमातून ठरवलेलं उद्दीष्ट पूर्ण करणं शक्य नव्हतं. मायावतींनी बामसेफचा उत्तरप्रदेशात विस्तार करण्याचं मोठं काम केलं. कांशीराम हे पंजाबचे होते तरीही मायावतींमुळे त्यांचा जम उत्तर प्रदेशात बसला.

1981 पर्यंत कांशीराम यांना आपल्या ताकदीचा अंदाज आला होता. त्याच दरम्यान त्यांनी एका नव्या मंचाची घोषणा केली. त्याचं नाव होतं दलित शोषित समाज संघर्ष समिति, थोडक्यात 'डीएस4' या नव्या मंचाच्या घोषणा आक्रमक होत्या 'ठाकुर, ब्राह्मण, बनिया छोड़ बाकी सब हैं डीएस4.' याच जातींना कांशीराम यांनी लक्ष्य केलं होतं. आपली  सर्व शक्ती त्यांनी या संघटनेसाठी दिली होती. आपला आधार वाढत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर फक्त 11 वर्षांनी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. मायावती या देशाच्या पहिल्या दलित मुख्यमंत्री ठरल्या. त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते भारताच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या कांशीराम यांना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 05:59 PM IST

ताज्या बातम्या