आयसीसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

आयसीसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

भारतातून पळून जाऊन अतिरेकी संघटनेत सहभागी झालेल्या कल्याणच्या चार तरुणांपैकी एकाचा मृत्यू झालाय.

  • Share this:

26 आॅक्टोबर :  भारतातून पळून जाऊन अतिरेकी संघटनेत सहभागी झालेल्या कल्याणच्या चार तरुणांपैकी एकाचा मृत्यू झालाय. 2014 मध्ये हे तरुण आयसिस मध्ये सहभागी होण्यासाठी पळून गेले होते.

भारतातून पळून जाऊन आयसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या फहाद शेख या तरुणाचा दहशतवादी कारवाईत मृत्यू झाला. फहाद 2014 मध्ये कल्याण मधून आपल्या तीन मित्रांसह पळून गेला होता. ते चौघंही इराकला गेले आणि आयसीसमध्ये सहभागी झाले. इराक, तुर्की, सिरीया अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेकी कारवायांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. इराकला गेल्यानंतर या तरुणांना आयसीसनं प्रशिक्षण दिलं, आणि त्यांना अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी करुन घेतलं. एका निनावी नंबरवरुन आलेल्या कॉलनं फहादच्या कुटूंबियांना हे समजलं की, फहादचा लढताना मृत्यू झालाय.

फहाद सोबत अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजीद हेही आयसीसमध्ये सहभागी झाले होते. यानंतर सहिम तानकी आणि अमन तांडेल यांचा सिरीयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती अशाच प्रकारे फोनवरून देण्यात आली होती, तर आरिफ मजीद हा तरुण नोव्हेंबर २०१४ मध्ये भारतात परतला होता.

दरम्यानच्या काळात इसिसने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये फहाद झळकलाही होता. पळून गेल्यानंतरही हे तरुण आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते.

First published: October 26, 2017, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading